लेकरू विनवणी करत राहिलं; मात्र क्रूर बाप मारत राहिला! Video होतोय व्हायरल  SaamTvNews
महाराष्ट्र

लेकरू विनवणी करत राहिलं; मात्र, क्रूर बाप मारत राहिला! Video होतोय व्हायरल

संबंधित व्यक्तीचा शोध घेऊन कारवाई करण्याची मागणी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

एक निर्दयी बाप जो आपल्या मुलाला दांड्याने मारतोय, त्या लहान मुलाची बहीण त्या निर्दयी बापाला विनवणी करतेय, "पप्पा नका मारू दादाला, दादा रडू नको" तरीही हा निर्दयी बाप त्या मुलाला दांड्याने मारतोय. कोण आहे निर्दयी व्यक्ती याला शिक्षा झाली पाहिजे, असा संताप सध्या समाज माध्यमांवर व्हायरल होतोय.

या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओची दखल राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी घेतली आहे. व्हिडिओतील संवाद मराठीतील असल्याने हा प्रकार महाराष्ट्रातच घडला असल्याचे प्रथमदर्शनी वाटते. सदर व्यक्तीचा शोध घेऊन अल्पवयीन मुलाला अमानुषपणे मारहाण करणाऱ्या सदर व्यक्तीविरोधात तात्काळ कारवाई करण्याची मागणी रुपाली चाकणकर यांनी महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक श्री.संजय पांडे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Work Life Balance : नोकरी अन् घर सांभाळताना दमछाक होतेय? वर्किंग मदर्सनी वापरा 'ही' सोपी ट्रिक; ताण होईल गायब

Maharashtra News Live Update: बोगस शिक्षक भरती प्रकरणातील मुख्य सूत्रधारास मालेगाव संगमेश्वर येथे बेड्या

राज्यात सूर्य आग ओकणार; कुठे किती तापमान? वरुणराजा कुठे बरसणार?

kidney disease - सावधान! 'हे' दोन सामान्य आजार गपचूप खराब करत आहेत तुमची किडनी; सुरुवातीला दिसतच नाहीत लक्षणे

Sunday Horoscope: मेषसह या 3 राशींसाठी आजचा दिवस खास; कामात यश, मिळणार आनंदाची बातमी

SCROLL FOR NEXT