Former Paithan Mla Chandrakant Ghodke Passes Away; Sharad Pawar Camp Mourns saam tv
महाराष्ट्र

सहकार क्षेत्रातील दिग्गज नेता हरपला; शरद पवार गटातील विश्वासू नेत्याचं निधन

Chandrakant Ghodke Passes Away: पैठणचे माजी आमदार चंद्रकांत सोनाजी घोडके यांचे निधन झाले आहे. चंद्रकांत घोडके हे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते होते.

Bharat Jadhav

  • पैठणचे माजी आमदार आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत सोनाजी घोडके यांचे निधन झाले.

  • शरद पवार यांचे खंदे समर्थक म्हणून चंद्रकांत घोडके यांची राजकीय क्षेत्रात ओळख होती.

  • शरद सहकारी साखर कारखान्याचे माजी संस्थापक अध्यक्ष म्हणून त्यांनी सहकार क्षेत्रातही काम केले.

छत्रपती संभाजीनंगरमधील पैठणचे माजी आमदार, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते आणि शरद सहकारी साखर कारखान्याचे माजी संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत सोनाजी घोडके यांचे दुःखद निधन झाले. घोडके यांच्या निधनामुळे राजकीय वर्तुळातून शोक व्यक्त करण्यात येत आहे. पैठणच्या राजकीय, सामाजिक आणि सहकार क्षेत्रात शोककळा पसरली आहे. सुरुवातीपासून माजी आमदार चंद्रकांत घोडके हे शरद पवार यांच्यासोबत होते.

चंद्रकांत घोडके हे पैठणच्या राजकारणातील ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित होते. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे खंदे समर्थक म्हणून त्यांची ओळख होती. राजकारणात त्यांचा मोठा दबदबा होता. आमदार म्हणून त्यांनी पैठण तालुक्यातील विविध प्रश्नांना विधानसभेत वाचा फोडण्यासह सामाजिक आणि विकासात्मक कामांमध्ये योगदाने दिले होते.

सहकार क्षेत्रातही घोडके यांचे मोठे योगदान राहिले. शरद सहकारी साखर कारखान्याच्या उभारणीत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. संस्थापक अध्यक्ष म्हणून त्यांनी कारखान्याच्या विकासासाठी योगदान दिल्याने त्यांना सहकार क्षेत्रात ‘सहकार महर्षी’ म्हणून ओळखले जात. त्यांच्या निधनाने पैठणच्या राजकीय, सामाजिक आणि सहकार क्षेत्राची मोठी हानी झालीय. विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे. चंद्रकांत घोडके यांच्यावर मंगळवारी, 6 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता पैठण येथील सिद्धेश्वर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

cooking oil storage : ओट्यावर तेल नेहमी सांडत? मग, या ठिकाणी ठेवा तेलाची बाटली, तेल होणार नाही कधीच खराब

मंत्री राणेंच्या ताफ्यावर फेकल्या कोंबड्या; पाहा VIDEO

How Much Water To Drink Daily: 1, 2, 3, 4, की 5, दररोज किती लिटर पाणी प्यावे? नेमकं प्रमाण जाणून घ्या

Maharashtra News Live Update: राज ठाकरे MPSC आंदोलकांच्या भेटीला

Bigg Boss 20: 'बिग बॉस २०’मध्ये या आठवड्यात कोण होणार बेघर? काझी ते मेरी कॉमपर्यंत ७ स्पर्धकांवर एलिमिनेशनची टांगती तलवार

SCROLL FOR NEXT