Ladki Bahin Yojana News 
महाराष्ट्र

Ladki Bahin Yojana : लाडकींचा पंचनामा! लाभार्थी महिलांचे उत्पन्न, कागदपत्रे, जमीन तपासणार

Majhi Ladki Bahin Yojana Update: महायुती सरकारला लाडकी बहिण योजना डोईजड झालीये. लाडकीमुळे इतर योजनांवर मोठा आर्थिक परीणाम झालाय. त्यामुळेच आता या योजनेची काटेकोर अंमलबजावणी केली जात आहे.

Namdeo Kumbhar

Ladki Bahin Yojana News Update : 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेतील लाभार्थीची आता निकषांनुसार पडताळणी सुरू झाली आहे. पाच टप्प्यांत याची चौकशी सुरू असून अनेक लाडक्या बहिणी यादीतून बाहेर जाणार आहेत....निकषांनुसार किती लाडक्या बहिणींना याचा फटका बसणार? पाहूयात विशेष रिपोर्ट........

महायुती सरकारला लाडकी बहीण योजना डोईजड झालीये. लाडकीमुळे इतर योजनांवर मोठा आर्थिक परीणाम झालाय. त्यामुळेच आता या योजनेची काटेकोर अंमलबजावणी केली जात आहे. योजनेच्या निकषांनुसार लाभार्थ्यांची 5 टप्प्यांवर पडताळणी होणारेय. योजनेच्या प्रत्येक निकषांनुसार किती महिला पात्र आहेत, याची अंगणवाडी सेविकांमार्फत पडताळणी होणारेय. चारचाकी ‘गाडीवाल्या’ लाडक्या बहिणींची सर्वाधिक संख्या पुणे जिल्ह्यात आहे. आर्थिकदृष्टया सधन असलेल्या पश्चिम महाराष्ट्रात अपात्र बहिणींची संख्या जास्त ठरणार आहे.

लाडक्या बहिणींच्या पडताळणीचे 5 टप्पे

एका कुटुंबात एकपेक्षा अधिक सरकारी योजनेचे लाभार्थी

बनावट कागदपत्रांद्वारे योजनेचा लाभ घेणारे

कुटुंबातील एकाला निवृत्तीवेतन असल्यास

अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असणारे

5 एकरपेक्षा अधिक जमीन असलेले लाभार्थी अपात्र ठरवण्यात येणार आहेत.

लाडकी बहीण योजनेतील तब्बल पाच लाख लाभार्थी कमी झाले आहेत. त्यामध्ये 65 वर्षांवरील, संजय गांधी निराधार आणि नमो शक्ती योजनेच्या लाभार्थी महिला आहेत. दरम्यान कोणतेही नवीन निकष नाहीत, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. तर ही योजना पालिका निवडणुकीनंतर भाजप बंद करेल, असा संशय विरोधकांनी व्यक्त केलाय.

केंद्र सरकारची शेतकरी सन्मान योजना आणि राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला प्रत्येकी 12 हजार रुपये दिले जातात. राज्यात दोन्ही योजनांच्या 19 लाख महिला शेतकरी लाभार्थी आहेत. या योजनेतील महिला लाडकीचा लाभ घेत असतील तर त्यांचा अर्ज बाद केला जाणार आहे. अडीच कोटी लाभार्थ्यांची संख्या कितीने कमी होणार ते पाहणं महत्वाचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : तुमच्याकडे विधानभवनात सत्ता, आमच्याकडे रस्त्यावर, राज ठाकरेंचा कडक इशारा

Marathi Language: मायबोली मराठी भाषेचा उदय कधी झाला माहिती आहे का?

Marathi Bhasha Vijay Live Updates: केडियाचं ऑफिस उद्ध्वस्त; हा तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे – मनसैनिकांचा इशारा|VIDEO

Marathi Vijay Melava: हाच तो क्षण! उद्धव - राज ठाकरे २० वर्षांनी एकाच व्यासपीठावर; पाहा भावनिक क्षण

Badlapur Firing Jagdish Kudekar : "पोलिसांच्या चौकशीला सामोरं जायला मी तयार आहे... "; जगदीश कुडेकर यांचं मीडियासमोर स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT