Kokan Teachers Constituency Election, dnyaneshwar mhatre, Balaram Patil. saam tv
महाराष्ट्र

Teachers Constituency Election : कडूंच्या खेळीमुळे ज्ञानेश्वर म्हात्रेंचा मार्ग सुकर, बाळाराम पाटलांना संघर्ष

आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने राजकीय तर्कवितर्क लढविले जात हाेते.

साम न्यूज नेटवर्क

- सिद्धेश म्हात्रे

Teachers Constituency Election : कोकण शिक्षक मतदारसंघ निवडणुकीतही (Kokan Teachers Constituency Election) आता ट्विस्ट आला आहे. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपाला बंडखोर अपक्ष उमेदवार वेणूनाथ कडू यांचा बंड थंड करण्यात यश आले आहे. अपक्ष उमेदवार वेणूनाथ कडू यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज (application) मागे घेतला आहे.

वेणूनाथ कडू यांनी अर्ज मागे घेतल्यानंतर भाजपा (BJP) उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांना पाठींबा जाहीर केला आहे. गत निवडणुकीत वेणूनाथ कडू हे भाजपचे उमेदवार होते. यंदा मात्र पक्षाने त्यांना उमेदवारी नाकारली.

त्यामुळे नाराज झालेल्या वेणूनाथ कडू यांनी कोकण शिक्षक मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. आज त्यांनी उमेदवारी मागे घेतली. वेणूनाथ कडू यांच्या माघारीने भाजपाचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे (dnyaneshwar mhatre) यांचा मार्ग सुकर झाला आहे. दरम्यान या घडामाेडींमुळे महाविकास आघाडीचे (mva) उमेदवार बाळाराम पाटील (Balaram Patil) यांचा मार्ग खडतर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. (Maharashtra News)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Smoking and voice change: सिगारेट ओढल्याने आवाज घोगरा होतो? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

Maharashtra News Live Update: नसरापूर अत्याचार आणि खून प्रकरण, ४ दिवसात दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले जाणार

CNG भरण्याची 'ही' आहे योग्य वेळ, फुल प्रेशरमुळे वाचतील पैसे अन् वाढेल गाडीचे मायलेज

Petrol Diesel Rate: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पेट्रोल डिझेल महागलं की स्वस्त झालं? वाचा मुंबई पुण्यासह तुमच्या शहरातील दर

Famous Marathi Singer Death:सुगम संगीताचा सुवर्णकाळ संपला; ज्येष्ठ मराठी गायक काळाच्या पडद्याआड, संगीत विश्वावर शोककळा

SCROLL FOR NEXT