Railway Crime Saam tv
महाराष्ट्र

Railway Crime: धावत्‍या रेल्‍वेतून लांबवायचा महिलांचे मंगळसूत्र; चोरट्याला रेल्वे पोलिसांनी केली अटक

धावत्‍या रेल्‍वेतून लांबवायचा महिलांचे मंगळसूत्र; चोरट्याला रेल्वे पोलिसांनी केली अटक

चेतन इंगळे

वसई : लोकल ट्रेनमध्ये महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरणाऱ्या ३० वर्षीय तरुणाला रेल्‍वे पोलिसांनी (railway Police) अटक केली आहे. त्‍याच्‍याकडून ४ लाख १६ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी (Vasai) हस्तगत केला आहे. (Maharashtra News)

वसई रोड जीआरपी पोलिसांनी नालासोपारा रेल्वे स्थानकावरून सीसीटीव्हीच्या (CCTV) मदतीने आरोपीला पकडले आहे. मोहम्मद अमान हुसेन (रा. नालासोपारा) असे आरोपीचे नाव आहे. मोहम्मद हा डोक्यावर टोपी घालून आणि चेहऱ्यावर मास्क लावून चालत्या ट्रेनमधून प्रवाशांच्या सोनसाखळ्या आणि मंगळसूत्र खेचून पळून जात होता. असे अनेक प्रकार घडले होते. याबाबत पोलिसात देखील तक्रार होती.

सहा गुन्‍हे दाखल

रेल्‍वेत होत असलेल्‍या या प्रकाराबाबत आरोपीविरुद्ध वसई रोड ते बोरिवलीपर्यंत एकूण ६ गुन्हे दाखल असल्‍याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सीसीटीव्‍हीच्‍या आधारे संशयीतास ताब्‍यात घेत मुद्देमाल हस्‍तगत केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Housing Society : बॅचलर्सना सोसायटी घर नाकारू शकते का? कायदा नेमका काय सांगतो?

Ladki Bahin Yojana: गणेशोत्सवात लाडकीच्या खात्यात ₹१५०० येणार की ₹३०००, महत्वाची अपडेट आली समोर

Maharashtra News Live Update: नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने बनावट व्हॉट्सॲप बिझनेस अकाउंट

Gauri Ganpati : गौरी गणपतीच्या सणाला..., गणपतीला जास्वंद तर गौरीला कोणते फुले वाहतात?

India : पाण्यावर तरंगणारा महाल! अद्भुत सौंदर्य पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

SCROLL FOR NEXT