महाराष्ट्र

Vasai Virar News : अवैध बांधकामावर कारवाई करत नसल्याने पालिकेचा केला अंत्यविधी; तरुणाचे तिरडीवर झोपून आंदोलन

Vasai Virar News : वसई- विरार महानगरपालिका हद्दीतील नालासोपारा, वालीव व पेल्हार प्रभागात असंख्य अनधिकृत इमारतींचे काम चालू आहे.

Rajesh Sonwane

महेंद्र वानखेडे

वसई : वसई- विरार महानगरपालिका हद्दीतील नालासोपारा, वालीव व पेल्हार प्रभागात असंख्य अनधिकृत इमारती व औद्योगिक गाळ्यांचे अनधिकृत बांधकाम केले जातं आहे. (Vasai Virar News) कारवाई होत नसल्याने पालिका मुख्यालय परिसरात नानासाहेब कोळेकर या सामाजिक कार्यकर्ता तरुणाने पालिकेचा प्रतिकात्मक अंत्यविधी करून भर उन्हात तिरडीवर झोपून आंदोलन सुरु केले आहे. (Latest Marathi News)

वसई- विरार महानगरपालिका (Vasai Virar Corporation) हद्दीतील नालासोपारा, वालीव व पेल्हार प्रभागात असंख्य अनधिकृत इमारतींचे काम चालू आहे. मात्र त्याचे कोणतेही सोयरे सुतक पालिका अधिकाऱ्यांना नसून आर्थिक फायद्यासाठी प्रशासन या बांधकामांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप यावेळी लावण्यात आला. यामुळेच महानगर पालिकेचा अंत्यविधी करून हे आंदोलन करण्यात आले. पालिका आयुक्त अनिल कुमार पवार, अतिरिक्त आयुक्त रमेश मनाळे, सहाय्यक आयुक्त मनाली शिंदे व इंजिनियर यांचे फोटो बॅनरवर लावण्यात आले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

तरुण झोपला तिरडीवर 

महापालिकेकडून कारवाई होत नसल्याने या विरोधात तरुणाने आंदोलन केले आहे. या आंदोलनात तरुण तिरडीवर झोपून होता. दरम्यान शुक्रवारी सकाळपासून भर उन्हात सुरु असलेलय या आंदोलनाकडे अनेक नागरिकांच्या नजरा वळाल्या होत्या..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Shivneri Bus : दारु पिऊन शिवनेरी चालवत होता, प्रवाशांनी दारुड्या चालकाला रंगेहाथ पकडले अन् पुढे...

Maharashtra Politics : अजित पवारांना मोठा धक्का; धाराशिवातील बड्या नेत्याकडून पदाचा राजीनामा

Gaganbawda Tourism: कोल्हापूरपासून अगदी हाकेच्या अंतरावर वसलंय 'हे' ठिकाण, या विकेंडला नक्की भेट द्या

Ladki Bahin Yojana: "काहींना लाडकीचा लाभ नाही" , राम कदमांच्या वक्तव्यानं राजकारणात चर्चांना उधाण|VIDEO

Maharashtra Live News Update :नांदेडच्या गोदावरी नदीपात्रात उडी मारून तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT