Vasai Virar Saam TV
महाराष्ट्र

Vasai Virar : कोणतीही नोटीस न देता अनधिकृत चाळींवर हातोडा; वसई-विरारमध्ये 250 कुटुंब रस्त्यावर

साम टिव्ही ब्युरो

Vasai Virar : विरार येथून एक मोठी बातमी समोर आली आहे. विरार महामार्गालगत असलेल्या नालेश्‍वर नगर येथे अनधिकृत चाळी पाडण्यात आल्या आहेत. त्यामुळे तब्बल २५० कुटुंबे रस्त्यावर आली आहेत. महसूल अधिकाऱ्यांकडून ही कारवाई करण्यात आली आहे. मात्र यामुळे या कुटुंबांना मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागत आहे. (Homeless)

दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरू असतानाच ही कारवाई केल्याने या घरांमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या घटनेचा परिणाम त्यांच्या शिक्षणावर देखील होत आहे. बाहेर राहण्याची सोय नाही, जेवणाची सोय नाही अशात उघड्यावर या व्यक्ती सध्या राहत आहेत.

कोणतीही नोटीस न देता पाडलं घर

येथील रहिवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, भूमाफियांनी या आधी जेव्हा येथील घरांची विक्री केली त्यावेळी स्थानिक प्रशासनाने यामध्ये लक्ष दिले नाही. मात्र आता आम्हाला कोणतीही नोटीस न देता सरळ कारवाई करण्यात आली आहे. भूमाफिया सरकारी भूखंडांची बेकायदेशीरपणे विक्री करत असताना स्थानिक प्रशासनाने त्यावेळी लक्ष देणे गरजेचे होते, असं येथील नागरिकांनी म्हटलं आहे.

डोक्यावर असलेलं हक्काच घर काढून घेतल्याने येथील नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. गेल्या १० वर्षांपासून नागरिक या चाळींमध्ये राहत होते. येथील घराच्या पत्त्यानुसार त्यांच्याकडे आधार कार्ड, वीज बिल घराचील कर पट्टी येत होती. त्यांच्याकडे या जमिनीचे सर्व कागदपत्र आणि मतदार ओळपत्र देखील आहेत. मात्र तरी देखील या नागरिकांना जबरदस्तीने बाहेर काढण्यात आलं आहे.

वसई-विरारच्या ज्या चाळी तोडल्या आहेत त्या ठिकाणी लोकांना राहण्यासाठी डोक्यावर छत नाही. त्यात हा अवकाळी पाऊस आणि कर्जाचा डोंगर. येथे राहणाऱ्या एका व्यक्तीने सांगितल्यानुसार,त्याने नुकतेच या चाळीमध्ये घर खरेदी केले होते. घरासाठी त्याने कर्ज देखील घेतलं आहे. त्या कर्जाचे हप्ते सध्या तो भरत आहे. मात्र आता घर पाडल्याने त्या व्यक्तीसमोर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jarange vs BJP: मराठे भाजपचा एन्काऊंटर करणार; मनोज जरांगेंचा ट्रॅप, महायुतीला ताप?

Central Railway: मध्य रेल्वे मार्गावर कसाऱ्याजवळ स्पेशल पॉवर ब्लॉक, काही ट्रेनच्या मार्गात बदल तर काही रद्द; वाचा लिस्ट

Pune Crime: मोबाईल काढून घेतल्याने अल्पवयीन मुलाचा आईवर हल्ला, लाथाबुक्क्यांनी मारहाण अन् कात्रीने वार, पुण्यात खळबळ

Indian Oil Job: सरकारी नोकरीची संधी, इंडियन ऑइलमध्ये 'या' पदांसाठी निघाली भरती; अशा पद्धतीने करा अर्ज

Viral Video: मस्तच भावा! 'फुलवंती' गाण्यावर तरुणाचा गुलीगत डान्स; बेधुंद होऊन नाचला, VIDEO ला हजारोंची पसंती

SCROLL FOR NEXT