Vasai Latest news  Saam tv
महाराष्ट्र

हवेत भिरकावलं, चिमुकल्याला आपटलं; रिक्षाचालकाच्या विकृतीचा कळस

vasai news : वसईत एका रिक्षाचालकानं 4 वर्षांच्या चिमुकल्या मुलाला बेदम मारहाण केलीय... या मारहाणीचा व्हिडिओ CCTVत कैद झालाय... मात्र 4 वर्षांच्या चिमुकल्याशी त्या रिक्षाचालकाचं काय वैर होतं? या घटनेनं पालकांमध्ये भीतीचं कसं वातावरण पसरलयं... पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून....

Suprim Maskar

हा व्हिडिओ नीट पाहा...माणुसकीला काळिमा फासणारी आणि कुणाच्याही काळजाचा ठोका चुकवणारी ही घटना घडलीय....वसईत...वडिलांसोबत झालेल्या वादाचा बदला घेण्यासाठी रिक्षाचालक संदीप पवार या विकृतानं चक्क चार वर्षांच्या चिमुरड्याला जमिनीवर आपटून आपटून आणि फरफटत नेऊन जीवे मारण्याचा प्रयत्न केलाय... या अमानुष कृत्याचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आणि वसईसह संपूर्ण महाराष्ट्र हादरला.

वसईच्या अनुपम सोसायटीतल्या अतुल कोंढारेंचा रिक्षाचालक संदीप पवारशी वाद झाला...30 मार्चला संध्याकाळी सोसायटीत खेळताना कोंढारेंचा मुलगा रिक्षात बसला होता...त्यावेळी आरोपी संदीप पवार रिक्षाजवळ आला आणि त्याने इतर मुलांना हाकललं. 4 वर्षीय मुलाला पकडून आरोपीनं त्याचं डोक रिक्षाच्या मिटरजवळील लोखंडी रॉडला आपटलं..इतकचं काय तर आरोपीनं मुलाला फरफटत नेत, त्याला जोरात हवेत भिरकावत आपटलं.

विशेष म्हणजे, कपडे धोपटावे तसं मुलाला जमिनीवर जोरात आपटताना आणि मुलाच्या जीवाशी खेळताना या नराधमाला जरासुध्दा दया आली नाही. या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन आमच्या प्रतिनिधीनं पीडित मुलाच्या कुटुंबियांना गाठलं.

क्रूरतेची परिसीमा गाठणाऱ्या आरोपी रिक्षाचालकाचा राग इतका अनावर झाला होता की त्यानं चिमुकल्याचा थेट जीवे मारण्याचाच प्रत्यन केला... दरम्यान पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केलाय.

मात्र या घटनेनंतर किरकोळ वादातून लहान मुलांवर होणाऱ्या अशा जीवघेण्या हल्ल्यांमुळे पालकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय... बदल्याची आग थेट चिमुरड्याचा जीव घेण्यासाठी प्रवृत्त करत असेल तर माणुसकी नेमकी कुठे हरवली. या घटनेनंतर मी बदला घेतला, असं निर्लज्जपणे सांगणारा तो नराधम किती विकृत असेल... याचा विचार न केलेलाच बरा..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शेतकरी कर्जमाफसाठी शेतकऱ्यांंचं मंत्रालयाच्या बाजूला असलेल्या झाडावर चढून आंदोलन

Maharashtra Politics: मोठी बातमी! रायगडमध्ये भाजपच्या बड्या नेत्याविरोधात गुन्हा, राजकीय वर्तुळात खळबळ

Elephanta Caves : 'घारापुरी' लेणीला 'एलिफंटा' हे नाव कसं पडलं? कारण वाचून तुम्हीही व्हाल थक्क

उंची कमी असल्यास कपड्यांची निवड कशी करावी? जाणून घ्या 5 स्मार्ट स्टायलिंग टिप्स

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! मूळ वेतनात होणार ५१००० रुपयांची वाढ? कसं असेल कॅलक्युलेशन?

SCROLL FOR NEXT