Vasai News Saam tv
महाराष्ट्र

Vasai News: समुद्र किनारी क्रिकेट खेळण्याचा आनंद विरला; चेंडू आणायला गेला तो परतलाच नाही

समुद्र किनारी क्रिकेट खेळण्याचा आनंद विरला; चेंडू आणायला गेला तो परतलाच नाही

चेतन इंगळे साम टीव्ही वसई विरार

वसई : वसईमधील भुईगाव समुद्र किनाऱ्यावर क्रिकेट (Cricket) खेळण्यासाठी गेलेल्या १७ वर्षीय तरुणाचा समुद्रात बुडून मृत्यू (Death) झाल्याची घटना घडली आहे. साहिल त्रिभुवन असे या तरुणाचे नाव आहे. (Tajya Batmya)

साहिल त्रिभुवन हा औरंगाबाद येथून त्याच्या नातेवाईकांकडे वसई येथे आला होता. समुद्राचा आनंद घेण्यासाठी तो त्याच्या भावांबरोबर (Vasai) वसईमधील भुईगाव समुद्र किनारी क्रिकेट खेळण्यासाठी गेला होता. समुद्रात गेलेल्या चेंडू घेण्यासाठी साहिल गेला व पाण्याचा अंदाज न आल्याने तो समुद्रात बुडाला. सोबत असलेल्‍या भावांनी त्‍याला वाचवायचा प्रयत्‍न केला. परंतु, प्रयत्‍न अयशस्‍वी ठरला.

सकाळी किनाऱ्यावर सापडला मृतदेह

रात्रभर अग्निशमन दलाच्या जवानांनी साहिल याचा मृतदेह शोधला. मात्र तो सापडला नाही. सकाळी भुईगाव समुद्र किनाऱ्यावर साहिल याचा मृतदेह स्थानिक नागरिकांना आढळून आला. पोलीस व जीवरक्षकच्या मदतीने साहिल याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात हलविण्यात आला आहे. यावेळी नातेवाईकांनी आक्रोश केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: खुलताबादच्या खंडी पिंपळगावात विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान

दीड, ३, ५, ७ आणि १० दिवसच गणपती का बसवतात? जाणून घ्या यामागील परंपरा

Mental Health : टेन्शन अन् थकव्याने हैराण आहात? सकाळच्या या 9 सवयी नक्की करून पाहा

मोठी बातमी! मुंबईतील मराठा आंदोलनाला परवानगी नाकारली; मनोज जरांगेंनी स्पष्टच शब्दात दिला इशारा, म्हणाले...

Sleep Schedule: कधी लवकर तर कधी उशिरा झोपता? हृदयाच्या आरोग्यावर होऊ शकतो परिणाम; जाणून घ्या 'या' ७ टिप्स

SCROLL FOR NEXT