varun sardesai saam tv
महाराष्ट्र

पेंग्विन सेना म्हणणाऱ्यांना आम्ही चित्ता पार्टी म्हणायचं का? वरुण सरदेसाईंचा भाजपला टोला

युवासेना नेते वरुण सरदेसाई यांनी देखील भारतात चित्ते आणण्यावरून भाजपवर (BJP) निशाणा साधला आहे.

लक्ष्मण सोळुंके

Varun Sardesai News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या दिवशी भारतात नामिबियावरून चित्ते आणण्यात आले. हे चित्ते मोदी सरकारने कुनो नॅशनल पार्कमध्ये सोडले आहे. हेच चित्ते भारतात आणण्यावरून विरोधी पक्षातील नेत्यांनी मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारवर टीका केली. त्यानंतर आता युवासेना नेते वरुण सरदेसाई यांनी देखील भारतात चित्ते आणण्यावरून भाजपवर (BJP) निशाणा साधला आहे.

युवासेना सचिव वरुण सरदेसाई हे सध्या जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. जालन्यात वरुण सरदेसाई यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी वरुणसरदेसाई यांनी मोदी सरकार आणि शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला.

वरुण सरदेसाई म्हणाले, 'आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात पेंग्विन आणले यापासून पर्यटकांची गर्दी वाढून महापालिकेचं उत्पन्न वाढलं. मात्र, तेव्हापासून आम्हाला पेंग्विन सेना म्हणून डिवचले. आता यांनी चित्ते भारतात आणले आहे. त्यामुळे भाजपला आता 'चित्ता पार्टी' म्हणायचं का ? असा सवाल वरुण सरदेसाई यांनी भाजपला केला.

दरम्यान, वरुण सरदेसाई यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यावर देखील टीका केली. 'ज्या दिवशी निवडणुका होतील, त्या दिवशी गद्दार ४० आमदारांबरोबर किती भोकाचा पान्हा आहे हे त्यांनाही कळेल, असा टोला वरुण सरदेसाई यांनी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांना लगावला.

`मुंबई महापालिका ही महराष्ट्राच्या अस्तित्वाची लढाई असून भाजप सत्तेत आल्यास अमराठी महापौर होईल आणि मुंबई महाराष्ट्रापासून तोडली जाईल, अशी शक्यता देखील वरुण सरदेसाई यांनी वर्तवली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Deputy Election Commissioner: निवडणूक आयोगात मोठा फेरबदल! IAS प्रकाश राजपुरोहित नवे उप निवडणूक आयुक्त

Maharashtra News Live Update: रायगडमध्ये बर्निंग कारचा थरार! डोलवली रेल्वे स्थानकाजवळ कार जळून खाक

दुष्काळग्रस्त भागांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय; कोणत्याही रेशन दुकानात मिळणार धान्य

CNG कार चालकांचा थरकाप उडवणारी बातमी! धावत्या कारने अचानक घेतला पेट, चालकाचा जागीच कोळसा

Amravati Crime: इंजिनिअर मुलाचं आईसोबत भयंकर कृत्य, घरातील दृश्य पाहून सर्वजण हादरले

SCROLL FOR NEXT