NEET PAPER LEAK ROW: ACCUSED IN EXAM SCAMS NOW MLAS, POLITICAL DEBATE INTENSIFIES saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Bandh: वंचित आघाडीचा महाराष्ट्र बंद; विद्यार्थ्यांसाठी प्रकाश आंबेडकर मैदानात

Maharashtra Bandh: वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र बंदला राज्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. दिल्लीतील आंदोलक विद्यार्थ्यांसाठी प्रकाश आंबेडकर मैदानात उतरले होते. राज्यात अनेक ठिकाणी रास्ता रोको आणि दुकाने बंद ठेवुन सरकारचा निषेध करण्यात आलाय. पाहूया एक रिपोर्ट.

Girish Nikam

  • वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र बंदला राज्यभर संमिश्र प्रतिसाद मिळाला.

  • विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ प्रकाश आंबेडकर मैदानात उतरले.

  • अनेक ठिकाणी रास्ता रोको करून सरकारचा निषेध करण्यात आला.

नीट पेपरफुटीवरुन दिल्ली धगधगतेय. दिल्लीतल्या लाठीचार्जचे महाराष्ट्रातही तीव्र पडसात उमटत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक दिली. राज्यात ठिकठिकाणी वंचीतच्या कार्यकर्त्यांनी रॅली काढून, रास्ता रोको आंदोलन करुन सरकारचा निषेध केलाय. काही ठिकाणी दुकाने बंद ठेवून उत्स्फूर्त बंद पाळण्यात आला.

मुंबई

वंचित कार्यकर्त्यांनी मुंबई-सायन-मुलुंड महामार्गावर रास्ता रोको करत मार्ग बंद पाडला. दुसरीकडे वाशिनाका चेंबूर येथील भाजी मार्केट बंद ठेवण्यात आले होते. गोवंडी परिसरातही बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विरारमध्ये वंचितच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेलेय. मात्र, कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यासमोरच सरकारविरोधात आक्रमक आंदोलन केलं.

पुणे

पुण्यात भिडे वाडा ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. वंचितच्या कार्यकर्त्यांसह विद्यार्थी सहभागी झाले होते. सरकार विरोधी घोषणा देण्यात आल्या. कोथरूडमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ आंदोलन करण्यात आले.

कोल्हापूर

कोल्हापुरात वंचित बहुजन आघाडी आणि डाव्या चळवळीतील कार्यकर्त्यांनी नागरिकांना बंदचं आवाहन केलं. सेंट्रल बस स्टँड परिसरात हातात तिरंगा घेऊन कार्यकर्त्यांनी रॅली काढली.

नागपूर

नागपूरच्या संविधान चौकात वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. जंतर-मंतरवर आंदोलन करणाऱ्या तरुणांना पाठिंबा दर्शवत केंद्र सरकारविरोधात घोषणा दिल्या. आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांची पोलिसांनी धरपकड केली.

छत्रपत संभाजीनगर

छत्रपत संभाजीनगर जिल्ह्यातही बंदचे पडसाद उमटले. पैठण तालुक्यात अनेक ठिकाणी बाजारपेठ बंद असल्याचे चित्र पाहायला मिळाले. व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवत बंदला पाठिंबा दर्शविला. आडूळा गावातून निषेध मोर्चा काढण्यात आला.

नांदेड

नांदेडमध्येही महाराष्ट्र बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. काँग्रेस, ठाकरेसेना, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि मनसेचे कार्यकर्ते एकत्र आले होते. विद्यार्थ्यांनीही या बंदला पाठिंबा दिला.

अमरावती

बंदला अमरावती जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. तिवसा आणि दर्यापूरमध्ये सकाळपासून दुकाने बंद होती. अमरावती शहरात पोलिसांचा कडक बंदोबस्त होता.

नाशिक

वंचितच्या बंदच्या आवाहनाला नाशिक जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. मनमाडमध्ये सकाळपासूनच शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे दुकाने बंद ठेवली. मोदी सरकार विरोधात विरोधी पक्ष रस्त्यावर उतरले आहेत. विद्यार्थी आणि नागरिकांची त्यांना साथ मिळत आहे. जनतेचा हा रोष कोणत्या दिशेने जाणार ? सरकार नमते घेणार का? याकडे सगळ्यांचं लक्ष आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Railway Paper Leak: पेपर फोडणारेच जनता सेवकाच्या वेशात,माफिया मोकाटच

Medical Admission: वैद्यकीय प्रवेशात मॅनेजमेंट कोटा बंद; जागा अडवणाऱ्या विद्यार्थ्यांवर 2 वर्षांची बंदी

School Closed: मोठी बातमी! पालघरमधील शाळा, अंगणवाड्या आणि महाविद्यालयांना उद्याही सुट्टी

Maharashtra News Live Update: गुजरातमधील मुसळधार पावसाचा रेल्वेसेवेवर परिणाम; मुंबईकडे जाणाऱ्या अनेक गाड्या रद्द

Angoori Rasmalai Recipe: गोड खाण्याची इच्छा होते? मग झटपट बनवा स्वादिष्ट अंगुरी रसमलाई रेसिपी

SCROLL FOR NEXT