बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. या हत्याकांड प्रकरणातील मास्टरमाईंड असणाऱ्या वाल्मीक कराडला अटक करण्यात आली असल्याची चर्चा होत आहे.
मात्र बीड पोलिस आणि सीआयडी पथकाने कोणताही दुजोरा दिला नाही. आज संध्याकाळपर्यंत बीड शहरात वाल्मीक कराडला आणले जाऊ शकते किंवा तो स्वतः शरण येईल अशी ही सध्या चर्चा सुरू आहे. त्यानंतर त्याला कोर्टामध्ये आणले जाऊ शकते. या पार्श्वभूमीवर बीड पोलिस सतर्क झाले आहेत.
वाल्मीक कराडला सीआयडीच्या पथकाने ताब्यात घेतले असल्याची चर्चा सुरू आहे. अवादा कंपनीच्या २ कोटींच्या खंडणी प्रकरणात सीआयडीची ही कारवाई असल्याचे म्हटले जात आहे. पण याबाबत अद्याप पोलिस किंवा सीआयडी पथकाकडून अधिकृत माहिती समोर आली नाही. तर दुसरीकडे वाल्मीक कराड सीआयडीसमोर सरेंडर होणार असल्याचे देखील सांगितले जात आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मास्टरमाईंड वाल्मीक कराडच्या अटकेसाठी सीआयडीची ९ पथके तयार करण्यात आली असून ते त्यांचा शोध घेत आहेत. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे, सुधीर सांगळे हे फरार आहेत. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. तर याप्रकरणातील ७ आरोपींकी जयराम चाटे, महेश केदार, प्रतीक घुले, विष्णू चाटे या ४ आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणात मास्टरमाईंड म्हणून वाल्मीक कराडचे नाव घेतले जात आहे. या हत्याकांड प्रकरणानंतर वाल्मीक कराड फरार आहे त्याचा शोध घेतला जात आहे.
दरम्यान, वाल्मिक कराडच्या शोधात असलेल्या सीआयडीच्या हाती महत्वपूर्ण धागेदोरे लागले आहेत. सीआयडीला वाल्मिक कराडचे शेवटचं लोकेशन ट्रॅक करण्यात यश आले आहे. तांत्रिक विश्लेषणात वाल्मिक कराडचा शेवटचा ठावठिकाणा सीआयडीच्या हाती लागला आहे. फरार होण्यापूर्वी वाल्मिक कराड पुण्यात वास्तव्यास असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. १७ डिसेंबरला वाल्मिक कराडचे शेवटचं ॲक्टिव्ह मोबाईल लोकेशन पुण्यात होतं. पुण्यातून फोन बंद करून वाल्मिक कराड फरार झाल्याची माहिती समोर आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.