न्यायालयात सर्व न्यायाधीश, कर्मचारी व वकीलांचे लसीकरण  संजय जाधव
महाराष्ट्र

न्यायालयात सर्व न्यायाधीश, कर्मचारी व वकीलांचे लसीकरण

कोरोना महामारीच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या दृष्टीने खबरदारीचा उपाय म्हणून बुलढाणा जिल्हा व सत्र न्यायालयात लसीकरण करण्यात येत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

संजय जाधव

बुलढाणा : कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत असंख्य न्यायालयीन कर्मचारी, वकील व न्यायाधीश यांचा मृत्यु झाला होता.कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपासून संरक्षणासाठी बुलढाणा जिल्हा व सत्र न्यायालयात लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे. Vaccination of all judges, staff and lawyers in court

तिसऱ्या लाटेत कोणीही मृत्युमुखी पडू नये यासाठी जिल्ह्यातील सर्व न्यायालयात सर्व न्यायाधीश, कर्मचारी व वकील यांचे लसीकरण करण्यात येत असल्याची माहिती न्यायाधीश एस.एस.भूरे यांनी दिली आहे.

हे देखील पहा -

मागील दीड वर्षापासून संपूर्ण देशात कोरोना महामारीने अक्षरशः थैमान घातले आहे. कोरोनाच्या दोन लाटा येऊन गेल्या आहेत, यात असंख्य नागरिकांना आपल्या जिवाला मुकावे लागले आहे. आता तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली जात असून यासाठीच 18 ते 45 वर्ष वयोगटातील सर्वांनी लस घेणे आवश्यक असल्याने आता सर्वत्र लस उपलब्ध आहे.

त्यामुळे लस घेऊन जीव वाचवा असे आवाहन सुद्धा यावेळी करण्यात आले. बुलढाणा जिल्हा व सत्र न्यायालयात लसीकरण कक्ष उघडण्यात आले. त्याचे उद्घाटन जिल्हा मुख्य न्यायाधीश एस.एस.भूरे यांच्या हस्ते करण्यात आले व यावेळी न्यायालयातील असंख्य कर्मचारी वकील व सर्व न्यायाधीशांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे.

Edited By : krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sugarcane Juice: उसाच्या रसाचे आरोग्यदायी फायदे!

Maharashtra News Live Updates: नाशिक जिल्ह्यात उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार

Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, देवेंद्र फडणवीस यांचं मोठं वक्तव्य

Railtel Recruitment: सरकारी कंपनीत नोकरी करण्याची सुवर्णसंधी;अप्रेंटिस पदासाठी भरती सुरु; पात्रता काय? जाणून घ्या

गौरी खानला शालिनी पासीबद्दल जाणवते चिंता, काय आहे नेमक कारण?

SCROLL FOR NEXT