Maharashtra Weather Update Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Weather Update: विदर्भावर अवकाळीचं संकट! वादळी वाऱ्यासह गारपिटीचा इशारा, कोणत्या जिल्ह्यांना येलो अलर्ट?

IMD Alert For Vidharbh: विदर्भाला आज अवकाळी पाऊस झोडपून काढण्याची शक्यता आहे. वादळी वारे अन् गारपिटीसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. अनेक जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

Priya More

राज्यात सध्या ऊन पावसाचा खेळ सुरू आहे. काही जिल्ह्यांमध्ये कडाक्याचे ऊन तर काही जिल्ह्यांना अवकाळी पाऊस झोडपून काढताना दिसत आहे. राज्यात पुढचे ४ ते ५ दिवस महत्वाचे असून ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. आज पूर्व विदर्भात जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर विदर्भातील इतर भागात, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याने येलो अलर्ट जारी केला आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, ‎राज्यात आज अनेक ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरणासह उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता आहे. विदर्भातील चंद्रपूर आणि गडचिरोली येथे जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

पालघर, ठाणे, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, छत्रपती संभाजीनगर, बीड, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, गोंदिया आणि भंडारा या जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. या सर्व जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे.

विदर्भात आज वादळी वाऱ्यासह गारपिटीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मागील दोन दिवसांत नागपूरसह विदर्भाच्या अनेक भागात ढगाळ हवामान आणि पाऊस पडला. अवकाळी पावसामुळे विदर्भातील तापमानात घट झाली. गुजरातवर वाऱ्याची चक्रीय स्थिती निर्माण झाल्याने पुढील ५ दिवस राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज आहे.

बुधवार आणि गुरुवारी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रातून मोठ्या प्रमाणावर बाष्पयुक्त वारे राज्याच्या दिशेने येत आहेत. उष्ण आणि दमट वाऱ्याच्या संगमातून कोकण वगळता संपूर्ण महाराष्ट्रात पुढील ५ दिवस अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

काँग्रेसनं विदर्भात भाकरी फिरवली! नव्या नेत्याकडे सोपवली प्रभारी जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी

Tiger Shroff: टायगर श्रॉफने विकला मुंबईतील आलिशान फ्लॅट; गोळीबाराच्या घटनेनंतर ६ दिवसांत घेतला मोठा निर्णय, किती रुपयांची झाली डील?

मुंबईमधील हायप्रोफाईल भागातील इमारतीला भीषण आग; जीव वाचवण्यासाठी रहिवाशांची पळापळ

माशांच्या वासाचं कारण देत कोळी महिलांना BEST बसमध्ये प्रवेश नाकारला; मुंबईतील संतापजनक प्रकार

भीमाशंकरच्या जंगलात 32 हजार झाडांची कत्तल; टोरंट पॉवरसाठी 600 एकरवरील झाडांवर कुऱ्हाड

SCROLL FOR NEXT