Unseasonal rain Saam Digital
महाराष्ट्र

Unseasonal rain : चंद्रपूर जिल्ह्याला अवकाळीचा तडाखा; चंद्रपूर-आदिलाबाद राष्ट्रीय महामार्गावरील पूल गेला वाहून

Heavy Rain In Chandrapur : चंद्रपूर जिल्ह्यातील काही भागात आज अवकाळी पावसाचा तडाखा बसला. त्यामुळे नदीनाल्यांना पाणी आलं आहे. दरम्यान अवकाळी पावसामुळे चंद्रपूर जिल्ह्यातल्या कोरपना तालुक्यातील ढोपताळा येथे नाल्यावर तात्पुरता उभारण्यात आलेला पूल वाहून गेला आहे.

Sandeep Gawade

चंद्रपूर जिल्ह्यातील काही भागात आज अवकाळी पावसाचा तडाखा बसला. त्यामुळे नदीनाल्यांना पाणी आलं आहे. दरम्यान अवकाळी पावसामुळे चंद्रपूर जिल्ह्यातल्या कोरपना तालुक्यातील ढोपताळा येथे नाल्यावर तात्पुरता उभारण्यात आलेला पूल वाहून गेला आहे. त्यामुळे चंद्रपूर-आदीलाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.

कोरपना शहराजवळील ढोपताळा येथे नाल्यावर नवीन पुलाचे बांधकाम सुरू आहे. त्यामुळे बाजूने नाल्यात पाईप टाकून पर्यायी मार्ग तयार करण्यात आला होता. मात्र आज दुपारी झालेल्या अवकाळी पावसाने अचानक नाल्यातील पाण्याचा प्रवाह वाढल्याने पाईप आणि रस्ता वाहून गेला. त्यामुळे चंद्रपूर ते तेलंगणा राज्यातील आदीलाबाद या मोठ्या शहरांना जोडणाऱ्या महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.

चंद्रपूरमध्ये आज दुपारच्या सुमारास अचानक अवकाळी पावसाचंआगमन झाले. विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाल्याचं पाहण्यास मिळालं. अचानक आलेल्या पावसाने चंद्रपुरात चाकरमान्यांची धावपळ उडाली. दरम्यान आज कोरपना शहराजवळील ढोपताळा येथे झालेल्या अवकाळी पावसाने पूल वाहून गेला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs AUS : विराटसोबत ऑस्ट्रेलियात पहिल्यांदाच असं झालं, कुणाला विश्वासही बसणार नाही

Calcium Deficiency: शरीरात कॅल्शियम कमी असल्यास कोणती गंभीर लक्षणे दिसतात? जाणून घ्या

Thackeray Shivsena News : ठाकरेंच्या शिवसेना नेत्याला जीवे मारण्याची धमकी, गुंडाच्या त्या कृत्यामुळे कल्याणमध्ये संताप, वाचा नेमकं काय घडलं?

Shrutz Haasan Photos: कपाळी टिकली अन् कातील नजर, साऊथच्या अभिनेत्रीने केले तरूणांना घायाळ

पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसला खिंडार; बड्या नेत्याची भाजपच्या दिशेनं वाटचाल, राजकारण तापलं

SCROLL FOR NEXT