Rain
Rain  SaamTv
महाराष्ट्र

Unseasonal Rain : अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची चिंता वाढवली; औरंगाबाद, जालन्यात पावसाची हजेरी

साम टिव्ही ब्युरो

Unseasonal Rain : ऐन थंडीत पडणाऱ्या पावसाने शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे. औरंगाबाद आणि जालन्यामध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसाने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे.

मराठवाड्यातील जालना आणि औरंगाबाद जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने तडाखा दिला. अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे उन्हाळी ज्वारी, मका, गहू आडवा झाला तर रबीतील हरभरासह इतर पिकांचं नुकसान झालंय.

औरंगाबाद जिल्ह्यातील अनेक ठिकाणी रात्री पावसाने हजेरी लावली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात काही ठिकाणी हलक्या तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा अवकाळी पाऊस झाला. पावसासोबत जोरदार वाऱ्यामुळे रब्बीच्या शेती पिकांचे आणि फळपिकांचे नुकसान झाले. आजही ढगाळ वातावरण असल्यानं पावसाची शक्यता वर्तविली जातेय. औरंगाबाद, बीडमध्ये पावसाची शक्यता आहे. दरवर्षी रबी पिकांना अवकाळीचा फटका बसत असल्यानं शेतकरी हताश झाला आहे. (Latest Marathi News)

जालन्यातही अनेक भागात दहा ते पंधरा मिनिटं विजेच्या कडकडाटसह पावसानं हजेरी लावली.जिल्ह्यातील बदनापूर, भोकरदन,अंबड तालुक्यात अनेक भागात हलका आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस झालाय. त्यामुळे गहू अनेक ठिकाणी आडवा पडला आहे. तर फुलोरा असलेल्या हरभरा पिकाची ही फुल गळती झालीय. वेचणीस आलेला कापूस भिजल्यानं कापसाचं काही प्रमाणात नुकसान झालं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

LSG vs KKR : कोलकाताकडून लखनऊचा दारूण पराभव, पॉइंट्स टेबलमध्ये मोठा उलटफेर

Canada Import from India : कॅनडा भारताकडून काय मागवतो

Uddhav Thackeray: मोदींचं PM पदासाठी नाव सुचवलं हे माझं पाप, उद्धव ठाकरे यांनी भरसभेत व्यक्त केली खंत

Mumbai Local : तीन प्रवाशांच्या मृत्यूनंतर मध्य रेल्वेला आली जाग; लोकलच्या गर्दी नियंत्रणासाठी घेतला मोठा निर्णय

Today's Marathi News Live : १७ लाख कुटुंबांनी भारतीय नागरिकत्व सोडलं; प्रकाश आंबेडकरांचा भाजपवर हल्लाबोल

SCROLL FOR NEXT