unseasonal rain hits marathwada 976 villages 9210 hectares loss Saam Digital
महाराष्ट्र

Unseasonal Rain Hits Marathwada: अवकाळीचा मराठवाड्यातील 976 गावांना फटका;9 हजार 210 हेक्टरवरील पिकांचे नुकसान

एप्रिल महिन्यात मराठवाडा विभागातील अनेक भागात वादळी वारा, विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली होती.

Siddharth Latkar

- रामनाथ ढाकणे

मराठवाड्यामध्ये एप्रिल महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांना जोरदार तडाखा दिला आहे. अवकाळी पावसाा फटला सुमारे 976 गावांना बसला आहे. यामध्ये 17 हजार 687 शेतकऱ्यांचे जवळपास 9 हजार 210 हेक्टर वरील पिकांच नुकसान झाले आहे. (Maharashtra News)

या नुकसानीचे पंचनामे हे निवडणुकीच्या धामधूमित रखडले. आता मंडळनिहाय नुकसान भरपाईची माहिती राज्य आपत्ती निवारण विभागाने मागवली आहे. यामुळे आकड्यांची जुळवा जुळव करताना प्रशासनाला नाकी नऊ येत आहे.

एप्रिल महिन्यात मराठवाडा विभागातील अनेक भागात वादळी वारा, विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली होती. त्यामध्ये वीज कोसळून 25 जणांचा मृत्यू तर 42 जण जखमी झाले. त्याशिवाय लहान मोठी 345 जनावर देखील दगावली. तसेच 725 हुन अधिक घरांची पडझड झाली होती. या नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यात वडगाव शेरीत मोकाट सोडलेल्या कुत्र्याचा १२ वर्षीय मुलावर हल्ला

Stock market today: सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजारात कोसळला! सेन्सेक्स-निफ्टी धडाम्, गुंतवणूकदारांचे कोट्यवधी पाण्यात

Death Certificate: मृत्यूच्या दाखल्याबाबत मोठा निर्णय, १ ऑक्टोबरपासून नियम कडक होणार; नोंदणी केली नाही तर...

Skin Tone Fashion Tips: फेअर, गव्हाळ की डस्की? स्किन टोननुसार कपड्यांचा रंग निवडण्याच्या ७ खास टिप्स

Janshatabdi Express : जनशताब्दी एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड; पेण स्थानकात ३ तासांपासून रेल्वे रखडली, प्रवाशांचे हाल

SCROLL FOR NEXT