unseasonal rain, satara, solapur, kolhapur saam tv
महाराष्ट्र

Unseasonal Rain News : सातारा, साेलापूरला पावसानं झाेडपलं; काेल्हापूरात मंडप काेसळला, पाहूणे मंडळी जखमी

पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.

Siddharth Latkar

- रणजीत माजगावकर / विश्वभूष्ण लिमये

Unseasonal Rain News : सातारा, साेलापूर, काेल्हापूरला अवकाळी पावसाने साेमवारी रात्री आणि मंगळवारी पहाटेच्या सुमारास झाेपडले. दरम्यान वादळी वाऱ्यामुळे कोल्हापूरातल्या हलोंडी येथील एका लॉनमधील लोखंडी लग्नमंडप कोसळल्याने अनेक जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे. (Maharashtra News)

काेल्हापूरात एक मोठी दुर्घटना साेमवारी रात्री उशिरा घडली आहे. एका लाॅनमध्ये सुरु असलेल्या कार्यक्रमाप्रसंगी वादळी वारे सुटले. वा-याचा वेग खूप माेठा हाेता. त्यामुळे मंडप काेसळला.

हा मंडप काेसळताना समारंभासाठी आलेल्या लोकांत घबराहाट पसरली. त्यात काही जखमी झाले. संबंधितांना 108 रुग्णवाहिका बोलवून तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान जखमींचा आकडा अद्याप समजू शकलेला नाही.

मळेगाव परिसरात अवकाळी पावसाची बॅटिंग

साेलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील मळेगाव परिसरातील पिंपरी, साकत, हिंगणी, जामगाव, महागाव, उपळे याठिकाणी आज (मंगळवार) सकाळपासून वादळी वारे आणि विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने जोरदार बॅटिंग केली.

अचानक आलेल्या पावसामुळे सर्वसामान्य नागरिकांना गारवा अनुभवायला मिळतो आहे. वादळी वाऱ्यामुळे वीजपुरवठा मात्र खंडित झाला आहे. मे महिन्यात सूर्य आग ओकत असताना अचानक आलेल्या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.

सातारा शहरात आज (मंगळवार) पहाटेच्या सुमारास वादळी वा-यासह जाेरदार पाऊस (unseasonal rain hits satara) झाला. यामुळे उकाड्यापासून त्रस्त झालेल्या शहरवासियांना माेठा दिलासा मिळाला आहे. या पावसामुळे भाजीपाल्याचे दर वाढण्याची शक्यता वर्तवली गेली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नवी मुंबई विमानतळाला मोदींचं नाव देण्याच्या भाजपमध्ये हालचाली; राऊतांच्या दाव्यानं खळबळ | VIDEO

Maharashtra Live News Update: पन्हाळगड परिसरात बिबट्याचा अपघाती मृत्यू

'गृहराज्यमंत्र्यांकडून गँगस्टरला शस्त्रपरवाना, मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा', शिवसेना आमदाराचा गंभीर आरोप

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना सप्टेंबर-ऑक्टोबरचे ₹३००० एकत्र येणार नाहीत? कारण काय?

Sunny Deol Film: सनी देओल त्याच्यापेक्षा ३३ वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत करणार रोमान्स; नव्या चित्रपटातील खास सीन लीक

SCROLL FOR NEXT