Maharashtra Weather Update Saam TV
महाराष्ट्र

Maharashtra Weather Update: मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासह विदर्भावर अवकाळीचे संकट, विजांच्या कडकडाटासह पाऊस; येलो अलर्ट

IMD Alert For Maharashtra: राज्यात पुन्हा पावसाला पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे राज्यावरील अवकाळी पावसाचे संकट दूर झालेले नाही. आजही मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासह विदर्भामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Priya More

राज्यावर असलेले अवकाळीचे संकट कायम आहे. राज्यात पावसाला पोषक हवामान तयार झाले आहे. सततच्या ढगाळ वातावरणामुळे राज्यातील कमाल तापमानात चढ-उतार पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून पडत असेला अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. आजही राज्यावर अवकाळीचे संकट कायम आहे.

मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासह विदर्भात आज वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. याठिकाणी पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर उर्वरीत राज्यात ढगाळ वातावरणासह उष्ण आणि दमट हवामान राहण्याचा अंदाज आहे. अवकाळी पावसाचे संकट लक्षात घेता नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी आणि सतर्कता बाळगावी असे आवाहन हवामान खात्याकडून करण्यात येत आहे.

आज मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सोलापूर या जिल्ह्यावर अवकाळीचे संकट आहे. मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, नांदेड याजिल्ह्यात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर विदर्भातील यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये देखील अवकाळी पाऊस पडण्याचा अंदाज आहे. या सर्व जिल्ह्यांमध्ये वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याकडून या सर्व जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे.

तसंच, सिंधुदुर्ग आणि हिंगोली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाची शक्यता आहे. उर्वरित राज्यात अंशतः ढगाळ हवामान राहिल. तर काही जिल्ह्यांमध्ये उष्ण आणि दमट हवामान राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. दरम्यान, रविवारी चंद्रपूरमध्ये ४२.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. चंद्रपूरमध्ये रविवारी देशातील सर्वात उच्चांकी तापमान होते. त्यापाठोपाठ संभाजीनगर, नागपूर आणि वाशिममध्ये ४१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana update: ...तोपर्यंत 'लाडकी'च्या खात्यात ₹१५०० येणार नाहीत, मंत्रालयातून आली मोठी अपडेट

Maharashtra Live News Update: धुळे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर बर्निंग कारचा थरार

Beed: बीडमध्ये ACB ची मोठी कारवाई, शेतकऱ्याकडून लाच घेताना तहसीलदाराला रंगेहाथ पकडलं

Pune : बांगलादेशातून थेट बुधवार पेठेत आणायचा महिला; कोण आहे पाचवी पास 'बाबू भैया'?

Viral Video: टर्न घेताना महिला रायडरचा ताबा सुटला, बाईक थेट खड्ड्यात; व्हिडीओ पाहून तुम्हालाही बसेल धक्का

SCROLL FOR NEXT