अजय सोनवणे
मंत्री छगन भुजबळ आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्यात मराठा आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. काही दिवसांपूर्वीच मंत्री छगन भुजबळ यांना फोनवरून जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. त्यानंतर आज मंत्री छगन भुजबळ यांच्या वाढदिवसाच्या बॅनरवर अज्ञात व्यक्तींनी शाहीफेक केली. तसेच बॅनरही फाडल्याचा प्रकार घडला आहे. भुजबळांचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या येवला मतदारसंघातच ही घटना घडली आहे. यामुळे राजकीय वर्तुळाच चर्चांना उधाण आलं आहे. (Latest Marathi News)
एकीकडे मंत्री छगन भुजबळ यांना जीवे मारण्याच्या धमकीचे फोन येत आहेत. तर दुसरीकडे त्यांच्या येवला मतदार संघात भुजबळांचा वाढदिवसाचा बॅनर फाडल्याचा प्रकार घडला आहे. ही घटना नाशिक राज्य महामार्गावर अंगणगावजवळ घडली आहे.
नेमकं काय घडलं?
मंत्री छगन भुजबळ यांच्या वाढदिवसाचा शुभेच्छा बॅनर अज्ञातांनी फाडल्याचा प्रकार समोर आला आहे. तसेच बॅनरवर शाहीफेक देखील करण्यात आली आहे. दरम्यान, छगन भुजबळ यांचा आज वाढदिवस असून यानिमित्त हा शुभेच्छा बॅनर लावण्यात आला होता.
तत्पूर्वी, छगन भुजबळ यांनी काल धमकीनंतर पहिली प्रतिक्रिया दिली होती. भुजबळ म्हणाले होते की, 'मला मराठ्यांनी मोठे केलं असं सांगून शिव्या दिल्या जात आहेत. मला मोठं शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरेंनी केलंय. मला मराठा समाजाची मदत झाली. जयंत पाटील, अजित पवार या मराठा नेत्यांसोबत काम केलंय, असे ते म्हणाले होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.