Beed News विनोद जिरे
महाराष्ट्र

ध्येयवेड्या तरुणाचा अनोखा उपक्रम; भोंग्याच्या राजकारणाविरोधात भोंगा घेऊन जनजागृती

राज्यात भोंग्याचे राजकारण पेटले

विनोद जिरे

बीड: राज्यात भोंग्याचे राजकारण पेटले असताना, बीडच्या (Beed) गेवराई तालुक्यातील एका तरूणाने, भोंगा घेऊन भोंग्याच्या विरोधात जनजागृती अभियान सुरू केले आहे. गावागावातील (village) सलोखा टिकवून ठेवण्यासाठी बाळासाहेब मस्के या तरुणाने हा अनोखा उपक्रम राबवला आहे.

हे देखील पाहा-

हनुमान चालीसासह भोंग्याचे राजकारण (Politics), यावरून महाराष्ट्रच नव्हे, तर देशभरामध्ये राजकारण पेटले असताना गाव खेड्यातील सामाजिक सलोखा आणि ऐक्य अबाधित रहावे. यासाठी बीड जिल्ह्यातील गेवराई (Gevrai) तालुक्यातील रेवकी गावातील 34 वर्षीय तरुणाने हातामध्ये भोंगा घेऊन गावागावात जागृतीला सुरुवात केले आहे. बाळासाहेब मस्के असे या तरुणाचं नाव आहे.

जनजागृतीच्या माध्यमातून, भोंग्याच्या नावाखाली तरुणांची डोकी भडकावणाऱ्या राजकारण्यांना चांगलीच चपराक दिली आहे. गेवराई तालुक्यातील पांढरवाडी गावात जनजागृती करताना, हातामध्ये भोंगा घेऊन भोंग्याचा राजकारणाद्वारे समाजावर होणाऱ्या दुष्परिणाम सांगणाऱ्या तरुणाचे, सर्व स्तरातून कौतुक होत आहे. भोंग्याच्या राजकारणाला बळी पडू नका, असा आवाहन हा तरुण गावागावांमध्ये जाऊन करत आहे. काही दिवसापासून या तरुणांना जनजागृतीचा वसा हाती घेतला आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी

संध्याकाळी टाईमपास खायला बनवा क्रिस्पी मखाना चिवडा; रेसिपी आहे एकदम सोपी

Thursday Horoscope: घरातले वातावरण आनंद राहील; 8 राशींच्या व्यक्तींची भरभराट होणार, वाचा उद्याचे राशीभविष्य

Fatty Liver Disease: पायांमध्ये ही 3 महत्त्वाची लक्षणं दिसली तर समजा लिव्हरवर चरबी साचलीये!

VIDEO VIRAL : ईssssss....गच्चाळ जागेवरच चिवड्याचा ढिग, तो कामगार अन् पॅकिंग... व्हिडिओ बघून किळस येईल

SCROLL FOR NEXT