लातूर : सोलापूर शहरातील देवांश विजयकुमार क्षीरसागर या 9 वर्षीय स्काऊट विद्यार्थ्यांने सोलापूर ते लातूर असा 130 किलोमीटरचा सायकलवरून प्रवास करत लातूरकरांना आझादी का अमृत महोत्सवानिमित्त पर्यावरण आणि गड किल्ल्याच्या संरक्षणाचा संदेश दिला आहे. या 9 वर्षीय सायकलविर देवांशचे सर्वत्र कौतुक होत आहे.
हे देखील पहा :
देवांश हा सोलापूर शहरातील नूतन मराठी विद्यालायात इयत्ता 3 रीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. त्यास बालवयातच सायकल रायडिंगचा छंद असून आज त्याने सोलापूर ते लातूर असा 130 किलोमीटर अंतरावर सायकल प्रवास करत पर्यावरण संरक्षण, गड किल्ल्याचे रक्षण याचा संदेश देत त्याने लातुरमध्ये आज आगमन झाले.
यावेळी लातूर भारत स्काऊट गाईडचे जिल्हा संघटन आयुक्त शंकर चामे, शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे धोंडीराम पाटील यांनी देवांशाचा सत्कार केला आहे. 9 वर्षीय देवांशने सामाजिक ऐतिहासिक सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी केलेला प्रवास आणि कार्य कौतुकास्पद आहे. नक्कीच स्काऊट शालेय जीवनात संस्कार संवर्धनाच कार्य करत आहे.
Edited By : Krushnarav Sathe
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.