पाडव्याच्या मुहुर्तावर म्हशी आणि रेड्याच्या अनोख्या स्पर्धा; स्पर्धेत केला म्हशींनी डान्स ! विजय पाटील
महाराष्ट्र

पाडव्याच्या मुहुर्तावर म्हशी आणि रेड्याच्या अनोख्या स्पर्धा; स्पर्धेत केला म्हशींनी डान्स !

दिवाळी आणि पाडव्याच्या मुहूर्तावर म्हशी आणि रेड्याच्या अनोख्या सौंदर्य स्पर्धा भरवण्यात आल्या होत्या.

विजय पाटील साम टीव्ही सांगली

सांगली : दिवाळी Diwali आणि पाडव्याच्या मुहूर्तावर म्हशी आणि रेड्याच्या अनोख्या सौंदर्य स्पर्धा भरवण्यात आल्या होत्या. अतिशय देखण्या टोलेजंग म्हशी Buffalo आणि या स्पर्धा पाहण्यासाठी सांगलीत तरुणांनी भली मोठी गर्दी केली होती.

हे देखील पहा -

सांगलीच्या गवळी गल्ली मध्ये गोपाळ मंदिरा समोर या म्हशी आणि रेड्याच रिंगण घालतात. तर याठिकाणी तरुणांनी या सजलेल्या आणि नटलेल्या म्हशी आणि रेड्यानं पाहण्यासाठी गर्दी केली होती. उत्साहाच्या वातावरणात हा सोहळा या ठिकाणी पार पडला. दर वर्षी प्रमाणे यंदा हा उत्साह वाढला होता.

म्हशी आणि रेड्या काळ्या भोर नटलेल्या उंचच्या उंच शिंगे शिंगावर मोराचे तुरे, चोरे कावळ्याची माळ, घंटी, पायात घुंगरू, झुल अतिशय देखण्या दिसत होत्या. तर म्हशी आणि रेड्याची नावं सुद्धा काजल, चित्रा, नवसर, राणा, हिरा, गज्या अशी रुबाबदार नावं होती. म्हशींनी यावेळी डान्स सुद्धा केला. आणि गाडीच्या समोर पळत होत्या. म्हशीच्या समोर मालक काठी घेऊन तिचा खेळ करत होता.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: चंद्रपूर- मनपा आमसभेच्या कोरमवरून महापौर नगरसेवकांमध्ये आरोप प्रत्यारोप

श्रावण कधीपासून सुरु होणार? जाणून घ्या तारीख आणि धार्मिक महत्त्व

Health Care : सतत थकल्यासारखे वाटते का? ' ही' ५ गंभीर लक्षणे फॅटी लिव्हरची असू शकतात, वेळीच ओळखा

Vaidehi Parshurami: पैठणीत खुललं वैदेही परशुरामीचं सौंदर्य; सोज्वळ सौंदर्याने जिंकली चाहत्यांची मनं

Live Update : निवडणूक चिन्ह कुणाचे? सर्वोच्च न्यायालयात सिब्बल, सरन्यायाधीश अन् जज बागची यांच्यात जोरदार चर्चा

SCROLL FOR NEXT