Ramdas athawale News Saam tv
महाराष्ट्र

Ramdas athawale: राहुल गांधींनी लग्न करावं, मुलगी मी शोधतो; आठवलेंनी दिली खुली ऑफर

Ramdas athawale on Rahul Gandhi: केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी राहुल गांधी यांना लग्नासाठी मुलगी शोधण्याची खास ऑफर दिली आहे. 'राहुल गांधी यांनी दलित मुलीशी लग्न करावं. मला त्यांनी सांगितलं तर लग्नासाठी मुलगी शोधतो, अशी ऑफर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी दिली आहे.

Vishal Gangurde

रामू ढाकणे, छत्रपती संभाजीनगर

Ramdas Athawale News:

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी राहुल गांधी यांना लग्नासाठी मुलगी शोधण्याची खास ऑफर दिली आहे. 'राहुल गांधी यांनी दलित मुलीशी लग्न करावं. मला त्यांनी सांगितलं तर लग्नासाठी मुलगी शोधतो, अशी ऑफर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी दिली आहे. ते छत्रपती संभाजीनगरमध्ये बोलत होते. (Latest Marathi News)

केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान केंद्रीय मंत्री आठवलेंनी पत्रकार परिषद घेत राज्यातील विविध बाबींवर भाष्य केलं. उद्धव ठाकरेंवर भाष्य करताना रामदास आठवले म्हणाले, 'संपणारे पक्ष संपवतात. माझ्या पक्षाला संपवण्याचा प्रयत्न झाला, तरीही आम्ही सक्षम आहे. एकनाथ शिंदे यांची अडीच वर्षानंतर खदखद बाहेर आली'.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निर्णयावर भाष्य करताना आठवले म्हणाले, 'राहुल नार्वेकर यांनी बहुमतावर निर्णय घेतला आहे. आमचं सरकार स्थिर आहे. मुख्यमंत्री शिंदे यांचं पद जाणार अशी अफवा पसरवू नये. आम्ही २०१२ साली मुंबई महापालिकेच्या निवडणुकीवेळी बाळासाहेब ठाकरे यांच्याशी चर्चा करून शिवशक्ती-भीमशक्तीचा नारा दिला. मुंबई शहरात माझ्या पक्षाची ताकद मजबूत आहे'. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

RPIला २ जागा पाहिजे: आठवले

'मंत्रिमंडळात आमचा मंत्री नाही. रिपाईमध्ये गट असेल पण आमचा तळागाळातील गट आहे. आम्हाला पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंत्रिपद मिळालं पाहिजे. आम्हाला डावललं जात आहे का, कळत नाही. पण आम्ही केंद्रीय मंत्री अमित शहा, जे.पी. नड्डा यांना भेटणार आहे. माझी राज्यसभा २६ सालापर्यंत आहे. मात्र मला संधी मिळाली पाहिजे. लोकसभा निवडणुकीत आरपीआयला दोन जागा मिळाल्या पाहिजे, असे ते पुढे म्हणाले.

राम मंदिराच्या लोकार्पणाच्या निमंत्रणावर आठवले काय म्हणाले?

'राम मंदिराचा लोकार्पण कार्यक्रम हा पक्षाचा कार्यक्रम नाही. राम मंदिर लोकार्पणाचं अद्याप निमंत्रण मिळालं नाही. मात्र निमंत्रण दिलं तर मी जाणार आहे, असे आठवलेंनी स्पष्ट केले आहे.

प्रकाश आंबेडकरांवर आठवले काय म्हणाले?

'प्रकाश आंबेडकर यांच्या बद्दल आदर आहे. ते आंबेडकरांचे वंशज आहेत. आमच्या समजातील अत्यंत हुशार नेते आहेत. मात्र, त्यांनी लवकर निर्णय घेतला पाहिजे. प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीला १२-१२ जागा वाटून घेतल्या तर आम्हाला त्यांचे बारा वाजवायला वेळ लागणार नाही'.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : एकनाथ शिंदे, अजित पवार आणि जयंत पाटील आघाडीवर

Lucky Zodiac Sign: आज या राशीचं नशीब चमकणार; शुभ बातमी कळणार

Maharashtra Election Result: फक्त लीड मोजा, १६० जागांवर महायुती येणारच; मुख्यमंत्री दिल्लीत ठरणार- चंद्रकात पाटील

Assembly Election Results : राजकीय हलचालींना सुरवात; ओझर विमानतळावर खासगी विमान दाखल

Kolhapur Crime News : कोल्हापूरच्या आदमापूर येथे गोळीबार; पोलिसांनी घेतले एकाला ताब्यात

SCROLL FOR NEXT