narayan rane
narayan rane Saam Tv
महाराष्ट्र

"यांची लायकी पोस्टर लावण्याची" राणेंची शिवसेनेवर टीका!

अमोल कलये

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर १९ पैकी ११ जागांवरती विजय मिळवत भाजपने जिल्हा बँकेवर सत्ता मिळवली आहे. या निवडणुकीला महाविकास आघाडी आणि भाजपने अत्यंत प्रतिष्ठेचे बनवले होते. मात्र, यामध्ये राणे गटाची सरशी ठरली. या निवडणुकीतील पराभवाने महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. या विजयानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन महाविकास आघाडी सरकार वरती जोरदार टीका केली.

हे देखील पहा :

राणे म्हणाले, हि सत्ता माझी नाही, हि सत्ता म्हणजे भाजपची सत्ता आहे. या जिल्ह्यातील नागरिकांच्या मतरूपी आशीर्वादाने तसेच देवदेवतांच्या आशीर्वादाने हि सत्ता राखण्यात आम्हाला यश आले आहे. या विजयामध्ये नितेश राणे आणि निलेश राणे यांनी विशेष मेहनत घेतली आहे.

सिंधुदुर्गच्या विजयानंतर महाराष्ट्रात सत्ता आणण्याकडे लक्ष्य केंद्रित करणार असल्याचे राणे म्हणाले. विजय मिळवताना अकलेचा उपयोग केला म्हणून जिंकलो असल्याचा टोला त्यांनी महाविकास आघाडीला लगावला. राजन तेली यांनी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला याबद्दल बोलताना राणे म्हणाले देशभरात आमची सत्ता असून योग्य ठिकाणी तेली यांची वर्णी लावणार आहे.

एका जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी तीन पक्ष एकत्र येतात, खुद्द राज्याचे अर्थमंत्री इथं येऊन प्रचार करून गेले. मात्र, तरीही त्यांच्या पदरात पराभव पडला आहे. या निवडणुकीत आम्ही महाविकास आघाडी त्यांची जागा दाखवून दिली असल्याची राणे म्हणाले. या निवडणुकीतील विजयानंतर राणे यांचा आत्मविश्वास प्रचंड वाढल्याचे दिसून आले. येत्या काळात महाराष्ट्रात पुन्हा भाजपचा मुख्यमंत्री पाहायचे असल्याचे राणे म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rakul Singh : असं रूपडं देखणं त्याला सूर्याचं रे दान

Home Remedies: उष्णता वाढल्याने जिभेला फोड आले आहेत? हे घरगुती उपाय ठरतील फायदेशीर

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेच २०२९ पर्यंत मुख्यमंत्री राहतील; आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचा मोठा दावा

Love Marriage Tips : लव्ह मॅरेज करताय? सासूबाईंना इंप्रेस करण्यासाठी खास टीप्स

Airtel Data Plans: 'हे' आहेत एअरटेलचे ५ स्वस्त डेटा रिचार्ज प्लान! पहा संपूर्ण यादी

SCROLL FOR NEXT