Maharashtra Local Body Elections News : महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वेध लागले आहे. चार महिन्याच्या आत राज्यात महापालिकेच्या निवडणुका होणार आहे, त्यासाठी सर्व पक्षाने कंबर कसली आहे. सत्ताधारी असणाऱ्या भाजपकडूनही जोरदार तयारी करण्यात आली आहे. मुंबई, ठाणे आणि पुण्यासारख्या प्रमुख महापालिकेसाठी भाजपकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. भाजपकडून या महापालिका स्वबळावर लढण्याची तयारी सुरू असल्याचे समोर आले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी तीन दिवसांच्या विदर्भाच्या दौऱ्यात याबाबत संकेत दिले. मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि पुण्यासारख्या महत्त्वाच्या महापालिका निवडणुकीत भाजप स्वबळावर लढण्याचे संकेत मिळाले आहेत.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मागील तीन दिवसांपासून महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी शाह यांनी राज्यात होणाऱ्या स्थनिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी ठाणे, मुंबई आणि पुणे शहरात स्वबळावर निवडणुका लढवण्याच्या चाचपणी करण्याच्या सूचना दिल्याचे सूत्रांनी दिली आहे. मुंबई आणि ठाण्यामध्ये एकनाथ शिंदे यांची मोठी ताकद आहे, तर पुण्यात अजित पवार यांचा होल्ड आहे, त्यामुळे भाजप स्वबळावर लढणार का? याची राजकीय चर्चा सुरू आहे.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी सह्याद्रीवर जात अमित शाह यांची भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिंदे यांनी मुंबई मनपामध्ये युतीमध्ये १०७ जागांची मागणी केली केल्याचं समोर आले आहे. शिंदे आणि अमित शाह यांच्यामध्ये वेगवेगळ्या विषयावर चर्चा झाली, पण सर्वाधिक चर्चेचा विषय मुंबई मनपा निवडणुका हाच होता, असे समोर आले आहे. मुंबईमध्ये २२७ प्रभाग आहेत, त्यामधील १०७ प्रभागात उमेदवार असल्याचा दावा शिंदेंनी केला. अमित शाह यांनी एकनाथ शिंदे यांचं मत जाणून घेतलं, मात्र कोणतेही ठोस अश्वासन दिले नसल्याचे समोर आलेय.
केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते अमित शाह यांनी महाराष्ट्राच्या दौऱ्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीचा आढवा घेतला. मुंबई, पुणे, ठाण्यासारख्या मनपामध्ये स्वबळावर लढण्यासाठी चाचपणी करण्याचा सूचनाही दिल्याचे समजतेय. २०१७ मध्ये मुंबई मनपामनध्ये भाजप आणि शिवसेना वेगळे लढले होते. भाजपला ९२ तर शिवसेनेले ८४ जागा मिळाल्या होत्या. पण आता शिवसेनेचे दोन गट झाले आहेत, त्यामुळे भाजपची ताकद वाढल्याचे दिसतेय. त्यामुळेच भाजपने स्वबळाची चाचपणी सुरू केल्याचे समजतेय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.