union budget 2024 means injustice to farmers says ravikant tupkar  saam tv
महाराष्ट्र

Ravikant Tupkar On Union Budget 2024 : शेतकऱ्यांसाठी निराशादायी अर्थसंकल्प : रविकांत तुपकर

शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी साम टीव्हीशी बाेलताना म्हणाले या अर्थसंकल्पात फारसे नवीन काही नाही असे म्हटले. बुलढाणा येथे त्यांनी अर्थसंकल्पाविषयी मत व्यक्त केले.

संजय जाधव

Buldhana News :

सरकारने निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन आजचा अर्थसंकल्प सादर केला गेला आहे. हा अंतरिम अर्थसंकल्प आहे. आजच्या अर्थ संकल्पातून शेतकऱ्यांच्या हाती काही लागेल असे वाटत नाही असे स्पष्ट मत (budget 2024 analysis) शेतकरी नेते रविकांत तुपकर (ravikant tupkar) यांनी व्यक्त केले. (Maharashtra News)

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (FM Nirmala Sitharaman) यांनी आज (गुरुवार) अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. मंत्री सीतारमण यांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर महाराष्ट्रातील नेते विशेषत: महाविकास आघाडीचे नेते आणि अन्य सामाजिक कार्यकर्ते अर्थसंकल्पातून राज्याला विशेष काही मिळाले नसल्याच्या भावना व्यक्त करु लागले आहेत.

शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी साम टीव्हीशी बाेलताना म्हणाले या अर्थसंकल्पात फारसे नवीन काही नाही. हा अर्थसंकल्प केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन सादर केला गेला आहे. यातून शेतकऱ्यांच्या हातात काहीही येईल असे वाटत नाही.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

साेयाबीनला भाव नाही, कापसाचे दर घसरलेत अन्य शेती मालाचे भाव पडले आहेत. त्याअनुषंगाने सरकारने अर्थसंकल्पात काही दिले गेले नाही. शेतक-यांना बाेनसच्या रुपाने काही तरी दिलं पाहिजे हाेते. पण तसं झालेले नाही.

मागील 10 वर्षातील अर्थासंकल्पाचे ऑडिट करायला पाहिजे. जेणे करून मागील 10 वर्षात ज्या घोषणा केल्या त्याची किती अमलबजावणी झाली हे समजू शकेल असेही शेतकरी नेते रवीकांत तुपकर यांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates : सांगोल्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा दीपक साळुंखे यांना पाठिंबा

IND vs AUS: BCCI चं काहीतरी चुकतंय? विराट- रोहितपेक्षा जास्त धावा करणाऱ्या फलंदाजाला ठेवलंय संघाबाहेर

Satara News: आधी पुण्यात ५ कोटी, आता साताऱ्यात एक कोटी; आचारसंहितामध्ये पोलिसांकडून मोठी कारवाई

Health Tips: रात्री उशिरा झोपताय? आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतील

Virat Kohli Birthday Special: शुटिंगदरम्यान पहिली भेट, प्रेम, ब्रेकअपच्या चर्चा अन् मॅचवेळी फ्लाइंग किस; विराट- अनुष्काची हटके लव्हस्टोरी

SCROLL FOR NEXT