Harshvardhan Patil  saam tv
महाराष्ट्र

Nira Bhima Sugar Factory Auction : 'निरा- भीमा'चा लिलाव हाेणार, हर्षवर्धन पाटलांसह शेतकरी अडचणीत

युनियन बॅंकेकडे निरा - भिमाचा ताबा असल्याचे नोटीसीत नमूद करण्यात आले आहे.

Siddharth Latkar

- नितीन पाटणकर

Pune News : निरा - भिमा सहकारी साखर कारखान्याने (Nira Bhima Sahakari Sakhar Karkhana) ३० कोटी ५६ लाख रुपयांचे कर्ज थकविल्याने युनियन बॅंकेने साखर कारखाना विक्रीबाबतची नोटीस काढली आहे. यामुळे भाजप नेते हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांच्यासह हजाराे शेतक-यांच्या अडचणीत आल्याची चर्चा आहे. (Maharashtra News)

भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्यावर स्वतःच्या साखर कारखान्याचा (sugar factory) लिलाव होण्याची नामुष्की ओढावली आहे. इंदापुर तालुक्यातील निरा - भिमा सहकारी साखर कारखान्याची लिलावाने विक्री होणार आहे. युनियन बॅंकेने साखर कारखान्याच्या विक्रीची नोटीस प्रसिद्ध केली आहे. हर्षवर्धन पाटील स्वतः या कर्जाला जामीनदार आहेत. तसेच, ते या कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष देखील आहेत.

युनियन बॅंकेने कारखान्याच्या विक्रीची नोटीस काढली आहे. बॅंकेने कारखाना विक्रीची कींमत ४० कोटी ३० लाख रुपये असे नाेटीसीत नमूद केले आहे. दरम्यान बॅंकेने लिलावाची नाेटीस काढल्याने हजारो ऊस उत्पादक शेतक-यांची मोठी अडचण होणार आहे. कारखाना येत्या गळीत हंगामात सुरु होणार का अशी शंका निर्माण झाली आहे.

दरम्यान हर्षवर्धन पाटील अनेक वर्ष राज्याचे सहकार मंत्री होते. माजी सहकार मंत्र्यांचाच कारखाना दिवाळखोरीत निघाल्याने सहकारी साखर कारखान्यांचे व्यवस्थापन कसे चालते हे पुन्हा एकदा समोर आले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: बळीराजाच्या सुख-समृद्धीसाठी डोंबिवलीत पार पडला नवकुंडात्मक सहस्रचंडी महायाग

Rajma vs Chole: राजमा की छोले, सर्वाधिक प्रोटिन कशात? उत्तर वाचून आश्चर्यचकित व्हाल

शेतजमीन खरेदीचा प्लॅन आहे का? ५ महत्त्वाचे डॉक्युमेंट्सच तपासाच; अन्यथा आयुष्यभराची कमाई बुडणार

high fiber superfoods : पोट निरोगी ठेवण्यासाठी फायदेशीर आहेत हे 7 फायबरयुक्त सुपरफूड्स

Upvasachi Batata Bhaji Recipe : नवरात्रीच्या उपवासाला बनवा दाण्याच्या कुटाची बटाट्याची भाजी, चव इतकी भन्नाट की पुन्हा पुन्हा खाल

SCROLL FOR NEXT