पोहायला गेलेल्या पुतण्याला वाचवताना काका-पुतण्याचा दुर्दैवी मृत्यु SaamTv
महाराष्ट्र

पोहायला गेलेल्या पुतण्याला वाचवताना काका-पुतण्याचा दुर्दैवी मृत्यु

जालना शहरापासून जवळच असलेल्या घाणेवाडी जलाशयात पोहायला गेलेल्या पुतण्याला वाचवण्यासाठी गेलेल्या काका आणि पुतण्याचा जलाशयात बुडून दुर्दैवी मृत्यु झाल्याची घटना घडली आहे.

लक्ष्मण सोळुंके

जालना : जालना शहरापासून जवळच असलेल्या घाणेवाडी जलाशयात पोहायला गेलेल्या पुतण्याला वाचवण्यासाठी गेलेल्या काका आणि पुतण्याचा जलाशयात बुडून दुर्दैवी मृत्यु झाल्याची घटना घाणेवाडी जलाशयात घडली आहे.

हे देखील पहा -

आज दुपारी तीनच्या सुमारास दत्तात्रय खंडागळे वय (वर्ष 18) राहणार मांडवा, हा पोहण्यासाठी घानेवाडी जलाशयात उतरला होता. त्याला खोल पण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडत असताना त्याची आरडाओरड ऐकून जवळ असलेले त्याचे काका परमेश्वर खंडागळे यांनी त्याला वाचवण्यासाठी पाण्यात उडी घेतली.

दत्तात्रायला वाचवण्याचा प्रयत्न परमेश्वर यांनी केला. मात्र दत्तात्रयने काकांच्या गळ्याला घट्ट मिठी मारल्याने दोघांचा ही पाण्यात बुडुन मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी जलाशयातून दोघांचेही मृतदेह बाहेर काढून त्यांना घाटी रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यांचा पाण्यात गुदमरून मृत्यु झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या घटनेने संपूर्ण मांडवा परिसरात शोककळा पसरली असून काका-पुतण्याच्या हळहळ व्यक्त केली जात आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Padmagad Fort History: सिद्दीला रोखण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी पाण्यात बांधला हा जलदुर्ग; नेमका आहे तरी कुठे?

Tuesday Horoscope: मेषसह ४ राशींचा मानसिक ताण वाढेल! काहींवर पैशाचा पाऊस, वाचा मंगळवारचे राशीभविष्य

Maharashtra Live News Update: जैन मुनी निलेशचंद्र यांचं उपोषण मागे, १५ दिवसानंतर घेतली माघार

Local Body Election : अजित पवार गट भाजप, शिंदे गटाला धक्का देण्याच्या तयारीत, धुळ्यात राजकारण तापणार

India's Richest Female Cricketers: भारतातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटपटू कोण आहेत? किती आहे संपत्ती?

SCROLL FOR NEXT