Kolhapur Youth March Saamtv
महाराष्ट्र

Youth March: पेन्शन नको काम द्या! जुन्या पेन्शनविरोधात बेरोजगारांचा मोर्चा; 'अर्ध्या पगारात काम करु' म्हणत उतरले रस्त्यावर

Unemployed Youth March: 'जुनी पेन्शन थांबवा आणि महाराष्ट्र वाचवा' असं म्हणत बेरोजगारांनी मोर्चा काढला आहे, जो सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरताना दिसत आहे...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

>>रणजित माजगावकर...

Kolhapur News: राज्यातील सरकारी कर्मचारी जुन्या पेन्शनसाठी आक्रमक झाले आहेत. गेल्या चार दिवसांपासून त्यांचा संप सुरू आहे. ज्याचा फटका सामान्य जनतेला बसताना दिसत आहे. आज या आंदोलनाचा चौथा दिवस आहे. एकीकडे कर्मचारी जुन्या पेन्शनसाठी लढत असताना दुसरीकडे आम्हाला पेन्शन नको, काम द्या या मागणीसाठीही कोल्हापूरमध्ये (Kolhapur) एक मोर्चा निघाला आहे. सध्या या मोर्चाची चांगलीच चर्चा पाहायला मिळत आहे.

सरकारी कर्मचाऱ्यांनी जुन्या पेन्शनसाठी गेली ४ दिवस संप पुकारला आहे. या विरोधात आता कोल्हापुरातील बेरोजगारांनी आंदोलन छेडल आहे. 'जुनी पेन्शन थांबवा आणि महाराष्ट्र वाचवा' असं म्हणत बेरोजगारांनी मोर्चा काढला आहे. कोल्हापूरच्या ऐतिहासिक दसरा चौकातून हा मोर्चा निघाला आहे. आम्हाला पेन्शन नको आम्ही अर्ध्या पगारावर काम करायला तयार आहे पण आम्हाला काम द्यावं अशी मागणी इथे जमलेल्या तरुणांनी केलेली आहे.

जुनी पेन्शन योजना थांबवा महाराष्ट्र वाचवा, असे पोस्टर या युवकांनी सोशल मीडियावर टाकलेत. आम्ही अर्ध्या पगारात काम करायला तयार आहोत. असं या बेरोजगार युवकांचं म्हणणं आहे. आंदोलन करणाऱ्या आंदोलकांनी टाऊन हॉल परिसर घोषणांनी आणि थाळी नाद करत दणाणून सोडला. कोल्हापुरात आज बेरोजगारांचा मोर्चा निघणार अशी पोस्ट गेली चार दिवस विविध माध्यमांवर फिरत आहे. मात्र या मोर्चाचे नेतृत्व करणारा समोर न आल्यामुळे हा मोर्चा काही तरुणांनी काढला.

आता काही दिवसातच पोलिसांची रीतसर परवानगी घेऊन जुन्या पेन्शन विरोधात आणि तरुणांना रोजगार मिळावा या मागणीसाठी बेरोजगार तरुण मोर्चा काढणार असल्याचं यावेळी सांगण्यात आले आहे.

एकीकडे जुन्या पेन्शनसाठी कर्मचाऱ्यांचे आंदोलन तर दुसरीकडे आम्हाला काम द्या. आम्ही अर्ध्या पगारात काम करायला तयार आहे. अशी मागणी करत बेरोजगारांनी काढलेला प्रति मोर्चा हा आज पश्चिम महाराष्ट्रात चर्चेचा विषय झाला आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांच्या सुख-समृद्धीसाठी मावळात महाचंडी आणि महापर्जन्य याग; 6000 भाविकांचा सहभाग

IAS Transfer: 4 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, राज्याच्या प्रशासनात मोठा फेरबदल

‘मोदी का बाप भी जाएगा’,भरसभेत खरगेंच्या विधानाने राजकारण तापलं! मोदींचं समर्थन करणाऱ्या तरुणालाही मारहाण

देशाच्या नंदनवनात साकारतोय भव्य रेल्वे प्रकल्प! 12 स्थानकं, 28 बोगदे अन् 57 पुलांचं जाळं; 83 टक्के प्रवास बोगद्यातून

2-3 महिन्यांत राजकारणात मोठी उलथापालथ; राज्यातील नेत्यांचे राजकीय भूकंपाचे संकेत

SCROLL FOR NEXT