'भीक' मागायला आणलेल्या अस्लम काकांना जायचंय घरी !
'भीक' मागायला आणलेल्या अस्लम काकांना जायचंय घरी ! संजय जाधव
महाराष्ट्र

'भीक' मागायला आणलेल्या अस्लम काकांना जायचंय घरी !

संजय जाधव

संजय जाधव

बुलढाणा: बुलडाण्यातील Buldhana धक्कादायक प्रकार आला समोर आला आहे. नांदेड Nanded येथुन दोघांनी पैशाचे आमिष दाखवुन सैय्यद अस्लम यांना बुलडाणा शहरात आणले होते. मात्र तीन दिवसात त्यांच्याकडून भीक मागुन पैसे गोळा करून टोळीतील एकाकडे द्यायची. काल संध्याकाळी अपंग असलेले सैय्यद अस्लम यांना टोळीतील अज्ञात व्यक्तींनी मारहाण केली. ही मारहाण पाहणाऱ्या सुजाण नागरिकांनी सैय्यद अस्लम यांची सुटका केली आहे, त्यांना आता त्यांच्या घरी जायचं, त्यामुळे त्यांना आता मदतीचा हात हवा आहे.

हे देखील पहा-

सैय्यद अस्लम, वृद्ध दोन्ही पायाने अपंग आहेत. ते मूळचे तामिळनाडु राज्यातील वानिबढ़ी येथील असून त्यांना जेवन, कपडे तसेच दोनशे रुपये मजुरी देतो, असे आमिष देवून एका टोळीने भीक मागण्यासाठी नांदेड येथून आपल्या सोबत बुलडाणा येथे आणले. नंतर या टोळीचा अस्लम काकांसोबत भीक मागण्याचा व्यवसाय सुरळीत सुरू होता, मात्र काल संध्याकाळी अपंग असणाऱ्या अस्लम काकांना या टोळीतील सदस्यांनी मारहाण केली.

या वृद्धाच्या भरवश्यावर भीक मागून दररोज जवळपास तीन ते चार हजार रुपये भिक मिळत होती, या पैशातून या टोळीतील सदस्य गांजा, दारू व अफीम सारखे व्यसन करायचे, तीन दिवस चांगले गेले मात्र आता या वृद्ध अपंगाला या टोळी सदस्यांनी मारहाण केल्याचा आरोप वृद्ध सैय्यद अस्लम करत आहे.

टोळीच्या या दूरव्यवहारामुळे वृद्ध अपंगाला आता त्यांच्यासोबत राहायचे नाही म्हणून ते आपल्या गावी जाण्यासाठी धडपडत आहे.. परंतु या टोळीचे सदस्य त्याला घरी जाऊ देत नव्हते, काल सायंकाळी बुलडाणा शहरातील संगम चौकाजवळ या टोळीतील सदस्य या अपंग वृद्धाला मारहाण करत होते. यामुळे अनेक लोक तिथे जमले व सर्व प्रकार लक्षात आल्यानंतर सुजान नागरीकांनी वृद्धाला या टोळी पासून मुक्त केले आहे.. पण आता या अपंग सैय्यद अस्लम काकांना आपल्या घरी जायचंय हवीय मदतीची गरज, सामाजिक संघटनांनी पुढे येवुन मदतीचा हात द्यावा हिच अपेक्षा आहे.

Edited By-Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Todays Horoscope: 'या' राशीच्या लोकांचं नशीब उजळलं; लवकरच गोड बातमी मिळणार, वाचा आजचे पंचांग

Maharashtra Politics: मी दिलेलं चॅलेंज स्वीकारलं नाही; श्रीकांत शिंदेंनी आदित्य ठाकरेंना डिवचलं

Who is Shashank Rao: बेस्ट स्ट्राईक, ऑटो युनियनचा झंझावती आवाज शशांक राव आहेत तरी कोण?

Maharashtra Election: राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी येणार एकाच मंचावर? शिवाजी पार्कात होणार सभा

Bihar Wedding Viral News : अजब-गजब प्रेम कहाणी: विधूर जावयासोबत सासऱ्यानेच लावलं बायकोचं लग्न

SCROLL FOR NEXT