Saam Impact|पूर पाण्यात अंधश्रद्धेचा बाजार मांडल्याच्या घटनेची होणार चौकशी

हा प्रकार साम टिव्ही समोर आणल्यानंतर आता या प्रकारच्या चौकशीचे आदेश महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी दिले आहेत.
Saam Impact|पूर पाण्यात अंधश्रद्धेचा बाजार मांडल्याच्या घटनेची होणार चौकशी
Saam Impact|पूर पाण्यात अंधश्रद्धेचा बाजार मांडल्याच्या घटनेची होणार चौकशी Saam Tv

अभिजित सोनावणे

नाशिक : नाशिकमध्ये Nashik साम टिव्हीच्या बातमीचा पुन्हा एकदा इम्पॅक्ट पाहायला मिळाला आहे. गोदावरीला Godavari पूर आलेला असतांनाही पुरपाण्यात अंधश्रद्धेचा बाजार मांडून अघोरी पूजाविधी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार 22 जुलैला घडला होता. हा प्रकार साम टिव्ही समोर आणल्यानंतर आता या प्रकारच्या चौकशीचे आदेश महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी दिले आहेत.

हा सर्व धक्कादायक प्रकार सुरू असतांना महापालिकेनं त्या ठिकाणी नेमलेल्या सुरक्षारक्षकांनी हा प्रकार का थांबवला नाही, कारवाई का केली नाही, याचीही चौकशी केली जाणार असून संबंधित सुरक्षारक्षकांवर कारवाई केली जाईल, अशी माहिती जाधव यांनी साम टिव्हीशी बोलतांना दिली आहे.

दरम्यान, धक्कादायक बाब म्हणजे गोदावरीच्या पाणीपातळीत वाढ झालेली असतांनाही महापालिकेनं नेमलेले सुरक्षारक्षक या ठिकाणी तैनात नसल्याने अगदी बिनदिक्कतपणे अंधश्रद्धेचा हा सर्व प्रकार इथं बराच वेळ सुरू होता. साम टिव्हीने या प्रकाराला वाचा फोडल्यानंतर अखेर खडबडून जागे झालेल्या प्रशासनानं तातडीनं या प्रकाराच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. गोदाघाटावर नेमणुकीला असलेल्या आणि हा सर्व प्रकार न थांबवणाऱ्या सुरक्षारक्षकांवर कारवाई केली जाईल, असं प्रशासनाकडून सांगण्यात आलं.

Saam Impact|पूर पाण्यात अंधश्रद्धेचा बाजार मांडल्याच्या घटनेची होणार चौकशी
अनु मलिकच्या आईच वयाच्या 86 व्या वर्षी निधन; नातू अरमान, अमालची भावनिक पोस्ट

नाशिकसह राज्यभरात याआधीही अंधश्रद्धेतून असले अघोरी प्रकार घडत असल्याचे प्रकार अनेकदा समोर आले आहेत. त्यामुळे राज्यातील अंधश्रद्धेचे हे प्रकार थांबणार तरी कधी? असा प्रश्न उपस्थित होत आहे. अंधश्रद्धेच्या भोंदूगिरी आणि अघोरी प्रकारांसंदर्भात गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत असली, तरी या प्रकारामुळे पुरोगामी महाराष्ट्रात अंधश्रद्धेची पाळंमुळं अजूनही किती खोलवर रुजलेली आहेत, हे स्पष्ट होत असून अंधश्रद्धेचं हे जोखड दूर सारण्यासाठी सर्वच पातळ्यांवर प्रयत्न करणं गरजेचं बनलं आहे.

Edited By-Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com