Aurangabad Municipal Corporation Saam Tv
महाराष्ट्र

औरंगाबाद महापालिकेला १७ मे 'अल्टिमेटम', पण प्रभागरचनेचा नकाशा रखडला

औरंगाबाद महापालिकेची निवडणूक दुसऱ्या टप्प्यात होणार आहे.

डॉ. माधव सावरगावे

औरंगाबाद - राज्य निवडणूक आयोगाने औरंगाबाद (Aurangabad) महापालिकेला 17 मे पर्यंत प्रभाग रचना तयार करण्याचे निर्देश दिले असले तरी 17 मे पर्यंत औरंगाबाद शहरातील प्रभाग रचनेचा आराखडा तयार करणे शक्य होणार नसल्याचे समोर आलं आहे. कारण निवडणूक आयोगाकडून शहराचा नकाशा अद्याप देण्यात आला नाही, अशी माहिती समोर आली आहे.

त्यामुळे औरंगाबाद शहराचा प्रभाग आराखडा तयार करण्यास बराच उशीर लागणार आहे. औरंगाबाद महापालिकेतील लोकप्रतिनिधींचा कार्यकाल 20 एप्रिल 2020 रोजी संपला. त्याला आता दोन वर्षे झाली आहेत. गेल्या दोन वर्षांपासून महापालिकेचा कारभार प्रशासकाच्या हाती आहे.

हे देखील पाहा -

देशातील कोणत्याही महापालिकेच्या इतिहासात इतका काल प्रशासक असल्याची ही बहुतेक पहिलीच वेळ असावी. आता विलंब झाला असतानाही पहिल्या टप्प्यात निवडणूक न होता दुसऱ्या टप्प्यात होणार असल्यानं आणखी किती काळ असाच प्रशासकाचा राहतो, हे पहावं लागणार आहे.

कारण महाराष्ट्रातील १४ महापालिकांमध्ये पहिल्या टप्प्यात निवडणुका घेण्यासाठी प्रक्रिया सुरू केली आहे. त्यात औरंगाबाद महापालिकेची निवडणूक दुसऱ्या टप्प्यात होणार आहे. मात्र, त्यासाठीही प्रभाग रचनेचीतयारी संथगतीने सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

High blood pressure: रोजच्या ताटातले हे 6 पदार्थ वाढवतायत तुमचं ब्लड प्रेशर

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

निवडणूक आयोगाचा भयंकर गोंधळ! पदवीधर मतदार यादीत थेट उद्धव ठाकरेंचे नाव; राजकीय वर्तुळात खळबळ

8th Pay Commission: 2027 मध्ये सॅलरी वाढली तर 2026 च्या पैशांचं काय? 8व्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट

Honey And Warm Water Benefits: कोमट पाण्यात मध मिक्स करून पिण्याचे फायदे काय?

SCROLL FOR NEXT