Ulhasnagar Crime Saam tv
महाराष्ट्र

Ulhasnagar Crime : जुन्या भांडणातून दोन गट भिडले; एकमेकांवर चढविला हल्ला, चारजण गंभीर जखमी

Ulhasnagar News : जुन्या भांडणातून रविवारी रात्री आफताब शेख आणि योगेश उर्फ बबड्या मिश्रा हे साथीदारांसह समोरासमोर आले. यानंतर त्यांनी थेट तलवार व चाकूने एकमेकांवर हल्ला चढवला

अजय दुधाणे

उल्हासनगर : एकमेकांसोबत असलेला जुना वाद उफाळून आल्याने दोन गटात जोरदार राडा झाला. यात दोन्ही गटाकडून एकमेकांवर हल्ला चढविण्यात आला होता. या राड्यात दोन गटातील चार जण गंभीर जखमी झाले असून जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सदरची घटना उल्हासनगरच्या साईनाथ कॉलनीत झाला. 

उल्हासनगरच्या कॅम्प ५ मधील साईनाथ कॉलनी राहत असलेल्या दोन गटातील नागरिकांमध्ये रविवारी रात्री वाद उद्भवला होता. यामुळे दोन गटात तुफान रक्तरंजित असा राडा झाला. या वादातून दोन्ही गटांनी एकमेकांवर तलवारीने हल्ले चढवल्याने यात चार जण गंभीर जखमी झाले आहेत. साईनाथ कॉलनीतील आफताब वकील अहमद शेख आणि योगेश उर्फ बबड्या मिश्रा यांच्यात जुन्या भांडणाचे वाद आहेत. 

एकमेकांसमोर येत तलवारीने हल्ला 

दरम्यान जुन्या भांडणातून रविवारी रात्री आफताब शेख आणि योगेश उर्फ बबड्या मिश्रा हे साथीदारांसह समोरासमोर आले. यानंतर त्यांनी थेट तलवार व चाकूने एकमेकांवर हल्ला चढवला. यामध्ये आफताब शेख, योगेश उर्फ बबड्या, धीरज विठ्ठले आणि इकबाल शेख हे चौघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर कळवा आणि उल्हासनगरच्या विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. 

परस्परविरोधी गुन्हे दाखल 

या राड्याप्रकरणी हिललाईन पोलिसांनी सोमवारी दुपारी परस्परविरोधी गुन्हे दाखल केले असून पोलीस अधिक तपास करत आहेत. या घटनेमुळे हिललाईन पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक राहिला आहे की नाही? असा प्रश्न उपस्थित झाला असून पोलिसांनी या घटनेबाबत प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोदी मंत्रिमंडळात सप्टेंबरमध्ये मोठा फेरबदल? ‘या’ दिग्गजांची धाकधूक वाढली; कोणाला लागणार लॉटरी?

शेतकऱ्यांसाठी मोठी गुड न्यूज! वनपट्टेधारक शेतकऱ्यांना कर्जमाफीसह सरकारी योजनांचा मिळणार लाभ

Maharashtra News Live Update: मनोज जरांगे पाटील यांची खालावलेली प्रकृती पाहून शहाजी बापू पाटील यांना अश्रू अनावर..

Aavalyacha Juice: महिनाभर प्या आवळ्याचा ज्यूस, १५ दिवसांत दिसेल शरिरात बदल

Watch Video : दुचाकीस्वार तरूण पुरात अडकला; नवविवाहितेनं जीवाची पर्वा न करता वाचवला जीव, थरारक व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT