Ulhasnagar News Saam tv
महाराष्ट्र

Ulhasnagar News : खदानीत बुडून तरुणाचा मृत्यू; मित्रांसोबत गेला होता पोहायला

खदानीत बुडून तरुणाचा मृत्यू; मित्रांसोबत गेला होता पोहायला

अजय दुधाणे

उल्हासनगर : उल्हासनगरजवळील म्हारळगावातील क्रांतीनगर येथे राहणारा तरूण ७ ते ८ मित्रांबरोबर (Ulhasnagar) खदानीजवळील धबधब्‍यावर पोहयला गेला होता. पाण्यात उतरल्‍यानंतर त्‍याला पोहता येत नसल्‍याने त्‍याचा बुडून मृत्‍यू (death) झाल्‍याची घटना घडली आहे. (Breaking Marathi News)

उल्हासनगरजवळील म्हारळगावातील उमेश अंबादास सोनवणे हा १४ जुलैला सायंकाळी म्हारळ हद्दीतील खदानीजवळ असलेल्या धबधब्यावर गेला होता. तिथेच खाली असलेल्या खदानमध्ये टीशर्ट धुतो आणि एक डुबकी मारून येतो; असे आपल्या मित्रांना सांगितले. खदान खोल असल्यामुळे व उमेशला पोहता येत नसल्यामुळे तो बुडाला. त्याला बुडताना काही मित्रांनी पाहिले. यानंतर त्याला वाचवण्यासाठी दोरी फेकली असता उमेश एकदा वर आला पण त्यानंतर तो आलाच नाही.

मित्रांमधील एकालाही पोहता येतं नसल्यामुळे कोणीही पाण्यात उतरले नाही. बराच वेळानी अग्निशामक दलांनी त्या ठिकाणी येऊन शोधण्यासाठी गळ टाकला. पण उमेशचा शोध लागला नाही. नंतर आधारवाडी अग्निशामक दलानी स्पीड बोटच्या साह्याने आत गेल्यानंतर त्याला बाहेर काढले. यावेळी उल्हासनगर व कल्याण येथील अग्निशामक दलाच्या अथक प्रयत्नानंतर उमेशचे शव बाहेर काढण्यात आले. खदान परिसरात म्हारळ ग्रामपंचायतीने सूचना फलक लावण्याची गरज आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नमाज पढता येतो का? मुंबईत पहलगामसारखा हल्ला; २ जणांवर चाकूने सपासप वार, ISIS कनेक्शन ?

तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढायचा; नराधम अत्याचारानंतर अश्लील व्हिडिओ काढून ब्लॅकमेल करायचा, कोल्हापुरात खळबळ

Maharashtra News Live Update: आमदार संजय गायकवाड यांच्या घराबाहरे डाव्या संघटनांचं आंदोलन

Crime News: काका-पुतणीला रात्री एकाच खोलीत पकडले, सकाळी दोघे फरार; बापाने उचलले टोकाचे पाऊल

डाएटिशियन पत्नीची हत्या करून मृतदेह सिमेंटच्या पेटीत गाडला, मुलाला लिहिलेल्या चिठ्ठीने बेरोजगार पतीचे बिंग फुटलं, नेमकं घडलं काय ?

SCROLL FOR NEXT