Ulhasnagar News Saam tv
महाराष्ट्र

Ulhasnagar News : उल्हासनगरमध्ये ज्‍वेलर्स दुकानात दरोडा; ३ कोटी २० लाख रुपयांचे सोने लांबविले, चोरटे सीसीटीव्हीत कैद

उल्हासनगरमध्ये ज्‍वेलर्स दुकानात दरोडा; ३ कोटी २० लाख रुपयांचे सोने लांबविले, चोरटे सीसीटीव्हीत कैद

अजय दुधाणे

उल्हासनगर : दुकान बंद असल्याचा फायदा घेत एका वॉचमनने आपल्या साथीदारांसह उल्हासनगर (Ulhasnagar) कॅम्प नंबर १ येथील विजयालक्ष्मी ज्वेलर्सच्या दुकानातील ३ कोटी २० लाख रुपयांचे सहा किलो दागिने लंपास केल्याची घटना उल्हासनगर पोलीस (Police) ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. या घटनेतील आरोपी सीसीटीव्‍ही कैमेऱ्यात कैद झाले असून या घटनेच्या तपासासाठी पथके तयार करण्यात आली आहेत. (Latest Marathi News)

उल्हासनगर कॅम्प नंबर १ येथील शिरू चौकात विजयालक्ष्मी ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. या परिसरातील सर्व दुकाने बंद असतात. या बंदचा फायदा घेत वॉचमनने आपल्या काही साथीदारांच्या मदतीने सोमवारी दुकान बंद झाल्यानंतर रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास दुकानात प्रवेश करून चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. गॅस कटरचा उपयोग करून ही चोरी (Robbery) करण्यात आली असून घटनास्थळी तब्बल चार सिलेंडर आढळून आले आहेत.

सव्‍वातीन कोटीचे सोने लांबविले

या चोरीत जवळपास सहा किलो सोने चोरीला गेल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त डॉ. सुधाकर पठारे, सहाय्यक पोलीस आयुक्त अमोल कोळी यांच्यासह गुन्हे अन्वेशन विभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. या गुन्ह्यातील आरोपी सीसीटीव्‍ही कैमेऱ्यात कैद झाले असून या घटनेच्या तपासासाठी पथके तयार करण्यात आली आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मालेगावच्या भुईकोट किल्ल्याच्या दुरुस्तीला अखेर सुरुवात

Maharashtra Politics: PM मोदींच्या आवाहनानंतर सरकारचा मोठा निर्णय, १२ आमदारांचा परदेश दौरा तातडीने रद्द

Jacqueline Fernandez ED Case: जॅकलिन फर्नांडिसला माफीची साक्षीदार बनवण्यास ईडीचा विरोध; कोर्टात अभिनेत्रीवर केले गंभीर आरोप

देवेंद्र फडणवीसांचा आणखी एक मोठा निर्णय, पोलिसांसाठी ₹१७६८ कोटी मंजूर

Colon Cancer: कमी वयातच कोलन कॅन्सरचा धोका, ही ४ लक्षणं दुर्लक्षित करूच नका; वाचा डॉक्टरांचा सल्ला

SCROLL FOR NEXT