Ulhasnagar News Saam tv
महाराष्ट्र

Ulhasnagar News : सार्वजनिक शौचालयात सापडले एक दिवसांचे नवजात अर्भक; उपचारासाठी रुग्णालयात दाखल

Ulhasnagar News : उल्हासनगर शहरातील कैंप नंबर ४ सुभाष टेकडी परिसरातील आम्रपालीनगर येथील सार्वजनिक शौचालयात आज सकाळच्या सुमारास एक महिला शौचालयास गेली होती. तेव्हा तिला शौचालयात एक बाळ असल्याचे दिसले

अजय दुधाणे

उल्हासनगर : उल्हासनगर शहरात एक हृदय हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. सार्वजनिक माहिला (Ulhasnagar) शौचालयात एका दिवसाचे स्त्री जातीचे नवजात अर्भक आढळून आले आहे. बाळाला परिसरातील नागरिकांनी शौचालयातून बाहेर काढून उपचारासाठी मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (Maharashtra News)

उल्हासनगर शहरातील कैंप नंबर ४ सुभाष टेकडी परिसरातील आम्रपालीनगर येथील सार्वजनिक शौचालयात आज सकाळच्या सुमारास एक महिला शौचालयास गेली होती. तेव्हा तिला शौचालयात एक बाळ असल्याचे दिसले. महिला घाबरून शौचालयाच्या बाहेर आली आणि परिसरातील नागरिकांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर परिसरातील नागरिकांनी बाळाला शौचालयातून बाहेर काढून उपचारासाठी मध्यवर्ती रुग्णालयात (Hospital) दाखल केले आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पोलिसांकडून शोध सुरु 

सदर घटनेची माहिती विठ्ठलवाडी पोलीस (Police) ठाण्याला देण्यात आली. यानंतर पोलीस घटनास्थळी पोहचत पंचनामा केला. यानंतर आजूबाजूच्या परिसरात चौकशी करत नवजात बाळाच्या आईचा शोध सुरु केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

SCROLL FOR NEXT