Ulhasnagar News Saam tv
महाराष्ट्र

Ulhasnagar Crime : शासकीय ओळखपत्र घालून आलेले तोतया अधिकारी ताब्यात; दोन महिलांचा समावेश

Ulhasnagar News : राजू कुकरेजा यांच्या दुकानात मंगळवारी सायंकाळच्या सुमारास चार जण गळ्यात महाराष्ट्र शासनाचे ओळखपत्र घालुन दूकानात आले. त्यांनी आम्ही महाराष्ट्र शासनाकडुन आलो आहोत; असल्याचे सांगितले

अजय दुधाणे

उल्हासनगर : तोतया पोलीस बनून फसवणूक करण्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. दरम्यान सरकारी अधिकारी बोलून महाराष्ट्र शासनाचे ओळखपत्र गळ्यात घालून एका दुकानदाराकडे दोन लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली होती. या चार तोतया अधिकाऱ्यांना उल्हासनगर मध्यवर्ती ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे यांच्या टीमने अटक केली आहे. 

उल्हासनगर कॅम्प क्रमांक तीन येथील खरटमल चौकात राजु कुकरेजा यांचे किराणा स्टोअर दुकान आहे. राजू कुकरेजा यांच्या दुकानात मंगळवारी सायंकाळच्या सुमारास चार जण गळ्यात महाराष्ट्र शासनाचे ओळखपत्र घालुन दूकानात आले. त्यांनी आम्ही महाराष्ट्र शासनाकडुन आलो आहोत; असल्याचे सांगितले. तसेच तुमच्या किराणा दुकानाची तपासणी करायची आहे; असे सांगत तपासणी करण्याचे नाटक केले. 

दोन लाख रुपयांची केली मागणी 

दुकानाची तपासणी करायचे सांगत तपासणी करायची नसल्यास आम्हाला दोन लाख रुपये द्या; असे बोलुन राजू कुकरेजा यांना धमकावले. मात्र आपल्या दुकानात आलेले अधिकारी हे खरे नसून तोतया असल्याचे राजु कुकरेजा यांना लक्षात आले. यानंतर त्यांनी लागलीच मध्यवर्ती पोलीस ठाण्यात फोन करून याबाबत माहिती दिली. यानंतर पोलीस पथक रवाना झाले. 

दोघांना २० पर्यंत पोलीस कस्टडी 

पोलीस उपनिरीक्षक प्रविण खंदारे यांच्या पथकाने दुकानात पोहचून या तोतया अधिकारी असलेल्या चौघांना अटक केली. अटक करण्यात आलेल्या चौघांमध्ये वैभव महादेव बगाडे, संतोष पारकर, सुभदा विचारे, शिल्पा पालांडे यांचा समावेश आहे. यातील दोन महिलांना नोटीस देऊन सोडण्यात आले. तर दोन आरोपीना न्यायालयाने २० तारखेपर्यंत पोलीस कस्टडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Car paint protection: कारचा रंग आणि चमक टिकवायचीये? या 7 टीप्सने गाडी वाटेल नवी कोरी

NCP Merger : मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर छगन भुजबळांचे राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर मोठे विधान, अर्थ खात्यावर स्पष्ट बोलले

दिवाळीआधी पगार मिळणार की नाही? एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनावर मंत्री प्रताप सरनाईक यांचा मोठा निर्णय

जेवताना घाई करण्याची सवय तुम्हाला आणू शकते मोठ्या संकटात; पोटाचे आरोग्य बिघडवण्यापूर्वी नक्की जाणून घ्या सत्य

Plank Benefits: खरचं वजन कमी करायचं आहे? मग सुरुवात करा 'या' व्यायामाने, मिळेल पॉझिटिव्ह बदल

SCROLL FOR NEXT