Ulhasnagar News Saam tv
महाराष्ट्र

Ulhasnagar News : टेम्पो चालकाने लांबविले १२ हजार लिटर खाद्यतेल; चालक उल्हासनगर पोलिसांच्या ताब्यात

Ulhasnagar News : खाद्यतेलाचा होलसेल व्यापार करणारे कमल वाघाणी यांनी खोपोलीतील कंपनीतून ११ लाख ९४ हजार रुपयांचे १२ हजार लिटर प्रिया रिफाईंड सनफ्लॉवर खाद्यतेल खरेदी केलं.

अजय दुधाणे

अंबरनाथ : कंपनीतून दुकानांवर पोहोच करण्यासाठी दिलेले तब्बल १२ हजार लिटर खाद्यतेल टेम्पो चालकानेच लांबविल्याची घटना उल्हासनगरमध्ये समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर उल्हासनगरच्या हिललाईन पोलिसांनी तपास करत टेम्पो चालकाला ताब्यात घेतले आहेत. तसेच त्याच्याकडून सुमारे ११ हजार लिटर खाद्यतेल जप्त केले आहे. 

खाद्यतेलाचा होलसेल व्यापार करणारे कमल वाघाणी यांनी खोपोलीतील कंपनीतून ११ लाख ९४ हजार रुपयांचे १२ हजार लिटर प्रिया रिफाईंड सनफ्लॉवर खाद्यतेल खरेदी केलं. या तेलाची अंबरनाथच्या (Ambarnath) पटेल रिटेल प्रायव्हेट लिमिटेड यांना डिलिव्हरी करायची असल्याने खोपोलीच्या पप्पू ट्रान्सपोर्ट कंपनीच्या टेम्पोमध्ये टाकून हे खाद्य तेल ट्रान्सपोर्ट केले. एक लिटरच्या प्रत्येकी १२ पिशव्या असलेले १ हजार बॉक्स या टेम्पोत ठेवण्यात आल्यानंतर गाडी मार्गस्थ करण्यात आली होती. 

दरम्यान चालक सोहेल खान याने खाद्य तेल दिलेल्या पत्त्यावर न पोहचविता परस्पर या तेलाची अफरातफर केली. तसेच नेवाळी नाका (Crime News) रस्त्यात टेम्पो सोडून पळ काढला होता. याबाबत माहिती मिळताच व्यापारी कमल वाघाणी यांनी उल्हासनगरच्या (Ulhasnagar) हिललाईन पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी तपासाची चक्रं फिरवत अमीर शेख आणि अली असगर खाटीक या दोन संशयित आरोपींना बेड्या ठोकल्या. त्यांच्याकडून ११ हजार लिटर तेल हस्तगत केले आहे. तर टेम्पो चालक सोहेल खान याचा शोध सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अधिकाऱ्यांना मारले, आता फेरीवाले आम्हाला पण मारणार, शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेवकांची महासभेत विनवणी

GT vs MI: अखेर मुंबई इंडियन्सला विजय मिळाला; तिलक आणि अश्विनीनं गुजरातचा धुव्वा उडवला

IAS Transferred : २४ IAS अधिकाऱ्यांसह १० जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांच्या धडाधड बदल्या, युपीच्या प्रशासकीय वर्तुळात खळबळ

Salary: सरकारी कर्मचाऱ्यांना एकाच महिन्यात दोन वेळा पगार मिळणार, 'या' देशानं घेतला मोठा निर्णय

Rain Alert in Maharashtra : महाराष्ट्रात पुढील ५ दिवस वादळी पाऊस; या जिल्ह्यांना हवामान विभागाचा सतर्कतेचा इशारा

SCROLL FOR NEXT