Ulhasnagar Crime Saam tv
महाराष्ट्र

Ulhasnagar Crime : कार दारात लावल्याने शेजाऱ्याला बेदम मारहाण; उल्हासनगराच्या पंजाबी कॉलनीतील घटना

Ulhasnagar news : ११ जानेवारी रोजी प्रितपाल संधू हे कार्यक्रमाला गेले होते. यामुळे ते रात्री उशिराने कार घेऊन घरी परतले. रात्री उशिरा घराजवळ आल्यानंतर त्यांनी कार पार्क करून घरी येऊन झोपले

अजय दुधाणे

उल्हासनगर : उल्हासनगरमध्ये कार पार्किंगच्या क्षुल्लक कारणावरून घरात घुसून शेजाऱ्यांनी एका व्यक्तीला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. यात एकजण गंभीर जखमी झाला असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. 

उल्हासनगर शहरातील कॅम्प ३ येथील पंजाबी कॉलनीमध्ये हा प्रकार घडला. कॉलनीतील प्रितपाल हरबखसिंग संधू हे पत्नी आणि दोन मुलांसह पंजाबी कॉलनीच्या गुरुद्वारा जवळ सेंट्रल पोलिस स्टेशनच्या हद्दीत राहतात. दरम्यान ११ जानेवारी रोजी प्रितपाल संधू हे कार्यक्रमाला गेले होते. यामुळे ते रात्री उशिराने कार घेऊन घरी परतले. रात्री उशिरा घराजवळ आल्यानंतर त्यांनी कार पार्क करून घरी येऊन झोपले.  

गाडी काढता न आल्याने राग 

मात्र प्रितपाल सिंग यांच्या कारमुळे शेजारी राहणाऱ्या कर्तार सिंह यांना त्यांची गाडी काढण्यात अडचण येत होती. याचा राग आल्याने कर्तार सिंह आणि त्यांच्या मुलाने प्रितपाल संधू त्यांच्या घरात जाऊन गोंधळ घातला. यावेळी वाद घालत करतार सिंग आणि त्यांच्या मुलाने प्रितपाल सिंग यांना मारहाण करण्यास सुरवात केली. यात त्याच्या डोक्यावर कोणत्यातरी हत्याराने जोरदार वार केले. यात ते जखमी झाले होते. 

पोलिसात दिली तक्रार 

जखमी झालेल्या प्रितपाल सिंग यांना मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान प्रितपाल सिंग यांच्या तक्रारीवरून मध्यवर्ती पोलिसांनी करतारसिंग लबाना, भाऊ बलवंत सिंग लबाना आणि कुलदीप सिंग लबाना यांच्याविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक पाटील तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुणे जिल्ह्यासाठी येलो अलर्ट, पुढील ३ तास महत्त्वाचे

Nagpur : नामांकित कॉलेजचा बोगस जात प्रमाणपत्र घोटाळा उघड, शिक्षक आणि विद्यार्थ्यांसह ११ जणांवर गुन्हा; नागपुरात खळबळ

धक्कादायक! करोडपती होण्यासाठी मांडली तंत्र-मंत्राची पूजा; सासऱ्याने सुनेला विवस्त्र करून पूजेला बसवलं

Bottle Gourd Leaves Benefits: आरोग्याचा खजिना, दररोज दुधी भोपळ्याची पाने चावून खाल्ल्याने होतील भन्नाट फायदे

Shocking : धक्कादायक! भर रस्त्यात महिलेला जमिनीवर पाडलं, कपडे फाडले अन्...; कुठे घडली भयंकर घटना?

SCROLL FOR NEXT