Ulhasnagar News Saam tv
महाराष्ट्र

Ulhasnagar : विनयभंगाच्या आरोपातून जेलमधून सुटताच उन्माद; तरुणीच्या घराबाहेर फटाके फोडत वाजवले ढोल ताशे

Ulhasnagar News : २७ एप्रिलच्या रात्री तीन जणांनी एका घराचा दरवाजा तोडला. यानंतर घरात घुसत घरातील दोन तरुणींना बाहेर खेचलं आणि त्यांच्या अंगावरील कपडे फाडून विनयभंग केला, असा आरोप होता

अजय दुधाणे

उल्हासनगर : उल्हासनगरात तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. काही दिवस जेलची हवा खाल्ल्यानंतर या आरोपीची जेलमधून सुटका झाली. जेलमधून सुटल्याबरोबरच या आरोपीने पुन्हा उन्माद घातल्याचे समोर आले आहे. बाहेर आल्यानंतर पीडित तरुणीच्या घराबाहेर जाऊन फटाके फोडले आणि ढोलताशे वाजविल्याचे समोर आले आहे. 

उल्हासनगरच्या कॅम्प २ मधील रमाबाई टेकडी परिसरात २७ एप्रिलच्या रात्री हंशू बिपिन झा, रोहित झा सोनमणी झा आणि बिट्टू सिताराम यादव यांनी एका घराचा दरवाजा तोडला. यानंतर घरात घुसत घरातील दोन तरुणींना बाहेर खेचलं आणि त्यांच्या अंगावरील कपडे फाडून विनयभंग केला, असा आरोप होता. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत आरोपींना उल्हासनगर पोलिसांनी अटक केली होती. 

जामिनावर सुटताच काढली मिरवणूक

या प्रकरणातील रोहित झा या आरोपीचा जामीन न्यायालयाने मंजूर केला. आधारवाडी कारागृहातून सुटल्यावर रोहितची मिरवणूक काढण्यात आली. इतकेच नाही तर त्याला रमाबाई टेकडी परिसरात आणण्यात आले. तिथे ज्या मुलीचा त्याने विनयभंग केल्याचा त्याच्यावर आरोप होता. तिच्या घरासमोर जाऊन फटाके फोडत ढोल ताशे वाजवत विकृत सेलिब्रेशन करण्यात आल्याची प्रकार घडला आहे. या प्रकारामुळे कुटुंबीय घाबरले आहे. 

पोलिसांचा धाक संपला का?

दरम्यान या प्रकाराचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. मात्र एखादा आरोपी जेलमधून सुटल्यावर फिर्यादीच्या घराबाहेर सेलिब्रेशन करत असेल, तर हा दहशत निर्माण करण्याचा प्रकार असून यामुळे उल्हासनगरचे पोलीस नेमके करतात काय? उल्हासनगरात पोलिसांचा धाक उरला आहे का? असा प्रश्न उपस्थित झालाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Latur Earthquake : सलग तिसऱ्या दिवशी लातूर भूकंपाच्या धक्क्यांनी हादरले, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण | VIDEO

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी, हिवाळी अधिवेशनात मिळणार कर्जमाफीची मोठी भेट? सरकारकडून हालचालींना वेग

Gaurav More: फिल्टरपाडा ते आलिशान टॉवर; गौरव मोरेला मिळाली म्हाडाच्या नव्या घराची चावी

Navratri Day 5: आजच्या दिवशी स्कंदमाता देवीला कमळाचे फूल अर्पण करा, तुमच्या इच्छा- आकांक्षा होतील पूर्ण

Maharashtra Live News Update: जिल्हा परिषद रोस्टरविरोधातली याचिका नागपूर खंडपीठानंतर सुप्रीम कोर्टाने फेटाळली

SCROLL FOR NEXT