Ulhasnagar Crime News Saam TV
महाराष्ट्र

Ulhasnagar Crime : मोठ्या भावाला पत्नीसोबत नको त्या अवस्थेत बघितलं; लहान भावाचं कृत्य पाहून पोलिसही चक्रावले

आरोपी अमित याने रोहितला आपल्या पत्नीसोबत (Wife) नको त्या अवस्थेत बघितले होते.

साम टिव्ही ब्युरो

Ulhasnagar Crime News : उल्हासनगर शहरातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अनैतिक संबंधाच्या संशयातून लहान भावानेच आपल्या मोठ्या भावाची निर्घृण हत्या केली. शहरातील शहाड परिसरातील एका कॉलनीत ही धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात सख्ख्या भावावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Latest Marathi News)

अमित (वय २६ वर्ष) असं अटक करण्यात आलेल्या लहान भावाचं नाव आहे. तर रोहित (वय २८ वर्ष) असे निर्घृणपणे हत्या झालेल्या मोठ्या भावाचं नाव आहे. पोलीस (Police) सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, मृत रोहित आणि आरोपी अमित हे दोन्ही सख्ख्ये भाऊ असून ते उल्हासनगर (Ulhasnagar) शहरातील एका कॉलनीत एकत्र राहतात.

दोघांचाही विवाह झालेला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून मोठा भाऊ मृत रोहित याचे लहान भाऊ अमितच्या पत्नीशी जवळीक वाढली होती. यातून दोघांमध्ये अनैतिक प्रेमसंबध निर्माण झाले. दरम्यान, एका दिवशी आरोपी अमित याने रोहितला आपल्या पत्नीसोबत (Wife) नको त्या अवस्थेत बघितले.

यावरून दोघांमध्ये मोठा वाद निर्माण झाला. त्यावेळी हा सर्व प्रकार चुकून घडला असं म्हणत रोहितने अमित याची समजूत काढली. दरम्यान, काही दिवसानंतर पुन्हा अमितने आपल्या पत्नीला रोहितच्या रुममध्ये जाताना बघितले. त्याने खिडकीतून डोकावून बघितले असता, दोघेही शारीरिक संबंध प्रस्थापित करत होते.

आपल्या मोठ्या भावाला पत्नीसोबत शारीरिक संबंध (Relationship) ठेवताना पाहून अमितला संताप अनावर झाला. त्याने भावाचा हत्येचा कट रचला. शुक्रवारी रोहित हा उल्हासनगर शहरातील शहाड फाटक परिसरात छत्रपती शाहू महाराज कॉलनीत राहणाऱ्या आजीकडे आला होता. त्यावेळी आजीच्या घरातच आरोपी अमित आणि रोहित या दोन भावांमध्ये जोरदार भांडण झाले. भांडण झाल्यानंतर रोहित आजीच्या घरात झोपला होता.

यावेळी आरोपी भाऊ अमितने घरातील दगडी पाटा थेट झोपलेल्या रोहितच्या डोक्यात मारून त्याला जागीच ठार (Crime News) केले. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच घटनास्थळी तात्काळ भेट देत पंचनामा करत रोहितचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात रवाना केला. पोलिसांनी आरोपी अमित याला ताब्यात घेतले. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करून अमितला अटक केली आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आमदार-खासदारांशी उद्धटपणे वागाल तर खबरदार...; अधिकाऱ्यांसाठी सरकारकडून नवे नियम जाहीर

Om Namah Shivaya Mantra Benefits: रोज १०८ वेळा ॐ नमः शिवाय मंत्राचा जप केल्याने शरीरावर आणि मनावर काय परिणाम होतो?

Chandrashekhar Bawankule : ओबीसींना आता १ रुपयात जमीन मिळणार! चंद्रशेखर बावनकुळेंचा निर्णय, सर्व विभागांना आदेश; पाहा सविस्तर

Maharashtra News Live Update: पश्चिम विदर्भातील 56 तालुक्यात दुष्काळ जाहीर

Pune Fort : पुण्याजवळ दडलाय इतिहासाचा खजिना! दोन डोंगरांवर वसलाय भव्य किल्ला

SCROLL FOR NEXT