Ulhasnagar Crime Saam tv
महाराष्ट्र

Ulhasnagar Crime : मिरची स्प्रे फवारत रिक्षा चालकाला बेदम मारहाण; उल्हासनगर रेल्वे स्थानक परिसरातील घटना

Ulhasnagar News : डोळ्यांत मिरची स्प्रे जाण्यामुळे त्यांनी जवळच्या इडली विक्रेत्याकडे याबाबत चौकशी केली. तेव्हा हृदय करमचंदानी नावाचा तरुण पुढे येत मिरची स्प्रे मीच मारला; असे म्हणत वाद घालू लागला

अजय दुधाणे

उल्हासनगर : उल्हासनगर रेल्वे स्थानक परिसरात एका रिक्षा चालकावर मिरची स्प्रे फवारून जबर मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मारहाणीत सदर रिक्षा चालक जखमी झाला असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तसेच या प्रकरणी रिक्षा चालकाने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. 

उल्हासनगरच्या कॅम्प ४ मधील मराठा विभागात वास्तव्यास असलेले गणेश सकपाळ असे जखमी रिक्षा चालकाचे नाव आहे. दरम्यान सोमवारी पहाटे ते स्थानकाजवळ रिक्षा रांगेत थांबले होते. याच वेळी अचानक डोळ्यांत मिरची स्प्रे जाण्यामुळे त्यांनी जवळच्या इडली विक्रेत्याकडे याबाबत चौकशी केली. तेव्हा हृदय करमचंदानी नावाचा तरुण पुढे येत मिरची स्प्रे मीच मारला; असे म्हणत वाद घालू लागला. दोघांमधील हा वाद वाढतच गेला. 

मारहाण करत झाला फरार 

काही क्षणातच त्याने सकपाळ यांच्या डोळ्यांत मिरची फवारली आणि हातातील स्टील कड्याने डोक्यावर व तोंडावर जोरदार मारहाण केली. या घटनेनंतर परिसरात गोंधळ उडाला. इतर रिक्षा चालकांनी मदतीस धाव घेतली असता, त्यांच्यावरही मिरची स्प्रे फवारण्यात आला. यानंतर हृदय करमचंदानी हा घटनास्थळावरून फरार झाला आहे. गंभीर जखमी सकपाळ यांच्यावर उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. स्थानिक पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

७० वर्षीय वृद्ध सासूला सुनेकडून मारहाण
लातूर : लातूरच्या शिरूर अनंतपाळ तालुक्यातील सुमठाणा गावात घरगुती शेतीच्या वादावरून एका वृद्ध महिलेला सुनेकडूनच मारहाण करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो. या व्हिडिओत त्या वृद्ध महिलेचे केस ओढत तिला फरफटकांना आणि लाथा बुक्क्यांनी मारताना दिसत आहे. दरम्यान या प्रकरणी अद्याप कुठलाही गुन्हा दाखल नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India Tourism: शिमला-मनालीही विसरून जाल! डोंगर, धबधबे आणि निसर्गसौंदर्याचं अप्रतिम मिश्रण, 'हे' हिल स्टेशन ठरेल स्वर्गीय अनुभव

Maharashtra Live News Update: मावळमध्ये महाविकास आघाडीची घोषणा, पाच पक्ष आले एकत्रित, पण सत्ता मिळेल का?

Bacchu Kadu : नाही तर सर्व रस्ते जॅम करु...बच्चू कडूंचा सरकारला अल्टिमेटम

Tilkut Chutney Recipe : थंडीची चाहूल लागताच बनवा चटकदार तिळकूट चटणी, वाचा कोकणी स्पेशल रेसिपी

Rajinikanth-Dhanush : रजनीकांत-धनुषच्या घरी बॉम्ब ठेवल्याची धमकी; पोलिसांकडून तातडीने कारवाई,नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT