Mohit Kamboj News Saam Tv
महाराष्ट्र

Mohit Kamboj News: 'उद्धव ठाकरेंच्या फ्रंटमॅनला अटक; काऊंटडाऊन सुरू...' मोहित कंबोज यांचा इशारा; ट्विट चर्चेत

Maharashtra Politics: जो लोग दूसरे के लिए गड्ढा खोद्ते है, वह खुद एक दिन उसी गड्ढे में गिर जाते हैं, असंही या ट्विटमध्ये म्हणले आहे...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Mohit Kamboj Tweet: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेलिंग प्रकरणातील बुकी अनिल जयसिंघानी (Anil Jaisinghani) याला आज मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) अटक केली. गेल्या काही दिवसांपासून अनिल जयसिंघानी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. अनिल जयसिंघानीच्या अटकेनंतर भाजपा नेते मोहित कंबोज यांनी ट्विट करत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. (Latest Marathi News)

याबाबत अधिक माहिती अशी की, अनिल जयसिंघानीच्या अटकेनंतर मोहित कंबोज यांनी याविषयी ट्वीट केलं आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी अनिल जयसिंघानीला उद्धव ठाकरेंचा (Udhav Thackeray) फ्रंट मॅन असं म्हटलं आहे. तसंच ठाकरे आणि माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना सूचक इशारा दिला आहे.

उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांचे फ्रंट मॅन अनिल जयसिंघानी यांना अटक झाली आहे. लवकरच माजी पोलीस आयुक्त संजय पांडे तसेच आणखी एका पोलिस अधिकाऱ्याची पोलखोल होणार आहे. त्यांचं काऊंटडाऊन सुरु झालंय, असा इशारा मोहित कंबोज यांनी दिला आहे.

काय आहे कंबोज यांचे ट्विट...

"उद्धव ठाकरेंचे फ्रंट मॅन बुकी अनिल जयसिंघानीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. माजी पोलीस आयुक्त संजय पांडे आणि आणि एक माजी पोलीस आयुक्त तुम्ही तुमचे दिवस मोजायला सुरुवात करा. तुमचं सत्यही लवकरच उघडं पडेल. जे लोक दुसऱ्यासाठी खड्डा खोदतात, ते स्वतःच एक दिवस त्या खड्ड्यामध्ये पडतात".

कोण आहे अनिल जयसिंघानी..

अनिल जयसिंघानी (Anil Jaysinghani) हा क्रिकेट बुकी आहे. 5 राज्यात 17 गुन्हे त्याच्या नावावर दाखल आहेत. गेल्या 8 वर्षांपासून तो फरार आहे. सट्टेबाजी प्रकरणात अनिल जयसिंहानीला तीन वेळा अटक करण्यात आली आहे. इतकंच नाही तर गोवा पोलिसांनी 11 मे 2019 रोजी अनिल जयसिंघानी याच्याविरोधात लुकआऊट नोटीसही जारी केली होती. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vengurla Tourism: समुद्राची शांतता, किल्ल्यांचा इतिहास, मंदिरांची भक्ती... हे सगळं एकाच ट्रिपमध्ये पाहायचंय? मग बॅग भरा आणि चला वेंगुर्ल्याला!

Maharashtra Live News Update: कल्याणच्या गोविंदवाडी बायपासवरील पुलाची सहा वर्षांत दुरवस्था

Sushil Kedia: ठाकरे काय करायचं बोल? राज ठाकरेंना टॅग करत उद्योजक सुशील केडियांची धमकी| VIDEO

Eknath Shinde: समोर अमित शाह, एकनाथ शिंदेंकडून 'जय गुजरातची' घोषणा|VIDEO

Eknath Shinde : जय गुजरात; एकनाथ शिंदेंची पुण्यात अमित शहांसमोरच घोषणा

SCROLL FOR NEXT