उदगीरमध्ये तब्बल २,१३४ कोटी ७९ लाख रुपयांचा कथित महाघोटाळा उघडकीस आला.
१६ कंपन्यांशी संगनमत करून आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे.
पैसा परदेशात पाठवल्याचा गंभीर आरोप या प्रकरणात करण्यात आला आहे.
विविध 16 कंपन्यांशी संगनमत करीत उदगीर येथील एका व्यक्तीने 2 हजार 134 कोटी 79 लाख 43 हजार 730 रुपयांचा घोटाळा केल्याचा प्रकार उघड झालाय. याप्रकरणी रात्री उदगीर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. आयकर विभागाकडून याप्रकरणी तपास सुरू होता. उदगीर शहरात गेल्या तीन दिवसांपासून आयकर विभागाच्या विविध पथकांकडून चौकशी सुरू होती. या चौकशीतून अखेर हा घोटाळा समोर आलाय.
उदगीरमधील मोंढा भागात आयकर विभागाच्या पथकाकडून तीन दिवसापासून तपास सुरू आहे. तपासानंतर घोटाळा उघड झाल्यानंतर पथकातील अधिकारीही चक्रावून गेले. दरम्यान याप्रकरणी उदगीर शहर पोलीस ठाण्यात रात्री उशिरा फिर्याद देण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर येथील उपआयकर विभागाचे संचालक दीपक कुमार यांनी या संदर्भात तक्रार दाखल केलीय.
दरम्यान, याप्रकारणी श्याम शिवप्रसाद कलानी याच्यासह इतर 16 कंपन्यांविरोधात फसवणूक आणि अफरातफरीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. श्याम शिवप्रसाद कालानी याने कंपनींशी मिळून हा घोटाळा केला. तर यात परदेशी निधी पाठवण्याच्या व्यवहाराची खोटी आणि बनावट प्रमाणपत्र तयार केली. या चुकीच्या पद्धतीचा वापर करून आर्थिक लाभाच्या हेतूने निधी परदेशी पाठवण्यास मदत केल्याचं सांगितलं जातंय. तर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत लातूरचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी या घोटाळ्याचा तपास लातूरच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवलाय.
उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या समोरच रात्री पैशांच्या देवाणघेवाणीवरून दोन गटांत जोरदार हाणामारी झाली. काही दिवसांपासून सुरू असलेल्या पैशांच्या व्यवहाराच्या वादातून शाब्दिक बाचाबाची झाली. त्यानंतर दोन्ही गट एकमेकांवर धावून गेले. घटना पोलीस ठाण्यासमोरच घडल्याने पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून दोन्ही गटांना वेगळे केले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.