Uddhav Thackeray  Saam TV
महाराष्ट्र

Maharashtra Politics News: अयोध्या दौऱ्याला ठाकरे गट उत्तर देणार! CM शिंदे रामजन्मभूमीत पोहोचताच सुरू केली तयारी; उद्धव ठाकरेंसह...

CM Eknath Shinde Ayodhya Tour: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या या अयोध्या दौऱ्याला ठाकरे गट उत्तर देण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे.

Gangappa Pujari

निवृत्ती बाबर, प्रतिनिधी...

Mumbai News: राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे शिवसेनेच्या आमदार, खासदार आणि मंत्र्यांसह अयोध्येत दाखल झाले आहेत. अयोध्येत रामलल्लाचं दर्शन घेणार आहेत. हा फक्त शिवसेनेचा अयोध्या दौरा असल्याचं सांगितलं जात होत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्याची चर्चा सुरू असतानाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही (Devendra Fadanvis) अयोध्या दौऱ्याला निघाले आहेत.

एकीकडे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचा अयोध्या दौरा सुरू असतानाच एकनाथ शिंदेच्या या अयोध्या दौऱ्याला ठाकरे गट अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या भागात दौरा करून उत्तर देण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. (Latest Marathi News)

याबाबत अधिक माहिती अशी की, राज्यभरात अवकाळी पावसाने मोठे नुकसान केले आहे. अचानक आलेल्या अस्मानी संकटाने शेतकऱ्यांच्या हाताशी आलेला घास हिरावून घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून राज्यभर दौरा आयोजित करण्यात येणार आहे. सध्या विदर्भ, मराठवाडा, नाशिक आणि अमरावती भागात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची माहिती घेण्याच काम सुरू असून त्यानंतर याबाबत नियोजन करण्यात येणार असल्याचे ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी सांगितले आहे.

या दौऱ्यामध्ये स्वतः शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे ((Udhav Thackeray) किंवा आदित्य ठाकरे जाणार असल्याचेही बोलले जात आहे. सध्या अवकाळी पावसाने केलेली नुकसान पाहणी स्वतः सर्व शिवसैनिक आमदार आणि स्थानिक प्रतिनिधी करतील, असेही अंबादास दानवेंनी यावेळी बोलताना सांगितले आहे. (Maharashtra Politics)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

तुमच्या सौंदर्यावर पाकचा क्रिम 'बॉम्ब', आरोग्याला घातक उत्पादनांची महाराष्ट्रात घुसखोरी

दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणामागे मोदींचा डाव? डिलिमिटेशनसाठी नेमकं काय घडतंय?

४,५०० लिटर डिझेलचा साठा पाहून पोलीसही चक्रावले; मुंबईत मोठी कारवाई

ऐरोलीत राहायचा, मुंबईतल्या बऱ्याच ठिकाणांची रेकी; दहशतवादी संघटनांच्या संपर्कातील तरुणाला ATS-पोलिसांनी ठोकल्या बेड्या

चतुरस्र अभिनेता-दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; चित्रपटसृष्टीवर शोककळा, ५ दशकांत ६०० हून अधिक चित्रपटांत केलं होतं काम

SCROLL FOR NEXT