Uddhav Thackeray saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंची पक्षप्रमुखपदी फेरनियुक्ती होणार! कायदेतज्ञांशी सल्लामसलत करून ठाकरे गटाची रणनीती

Shivsena crisis : सत्तासंघर्ष प्रकरणात सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालानंतर ठाकरे गट अॅक्शन मोडमध्ये आला असून शिवसेनेत (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) वेगाने घडामोडी घडत आहेत.

Chandrakant Jagtap

>> निवृत्ती बाबर, साम टीव्ही

Uddhav Thackeray Will Reappointed As Party Chief: सत्तासंघर्ष प्रकरणात सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालानंतर ठाकरे गट अॅक्शन मोडमध्ये आला असून शिवसेनेत (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) वेगाने घडामोडी घडत आहेत. येत्या १८ जूनला मुंबईत होणाऱ्या राज्य आणि राष्ट्रीय कार्यकारणी आणि राज्यभरातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत पुन्हा पक्षप्रमुखपदी उद्धव ठाकरे यांची निवड होण्याची शक्यता आहे.

विधानसभा अध्यक्षांपुढील सुनावणी, निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयापुढे कोणत्याही कायदेशीर व तांत्रिक त्रुटी राहू नयेत यासाठी ठाकरे गटाने पुढील रणनीती आखली आहे. यासाठी कादेशीर सल्ला घेऊ ठाकरे गटाने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.

शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) राष्ट्रीय कार्यकारिणी, राज्य कार्यकारिणी आणि राज्यभरातील पदाधिकाऱ्यांची बैठक आणि मेळावा १८ जूनला मुंबईत होणार आहे. यात उद्धव ठाकरे यांची पुन्हा पक्षप्रमुखपदी निवड केली जाण्याची शक्यता आहे. शिवसेना फुटीनंतर आणि ठाकरे यांच्या पक्षप्रमुखपदाची मुदत २३ जानेवारी २०२३ रोजी संपल्यानंतर प्रथमच ही बैठक होणार आहे.

विधानसभा अध्यक्षांपुढील सुनावणी, निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयापुढे कोणत्याही कायदेशीर व तांत्रिक त्रुटी राहू नयेत, यासाठी कार्यकारिणी व पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत आवश्यक ठराव, कार्यकारिणी सदस्य आणि पदाधिकाऱ्यांची निवड केली जाणार आहे. कायदेतज्ञांशी सल्लामसलत करुन त्याबाबतचे तपशील ठरविले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. (Breaking News)

शिवसेना राष्ट्रीय, राज्य कार्यकारिणी व पदाधिकाऱ्यांच्या बैठक आणि मेळाव्यासाठी तालुका पातळीपासूनच्या सुमारे तीन-साडेतीन हजार प्रमुख पदाधिकाऱ्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. शिवसेनेचा वर्धापनदिन १९ जूनला होणार असून उद्धव ठाकरे यांची षण्मुखानंद सभागृहात सभाही होणार आहे. (Latest Political News)

दरम्यान सत्ता संघर्षाचं प्रकरण आता विधानसभा अध्यक्षांकडे आले आहे. त्या दृष्टीनेही अध्यक्षांनी विरोधात निकाल दिला तर त्याविरोधात पुन्हा सुप्रीम कोर्टात धाव घेण्याच्यादृष्टीनेही ठाकरे गटाकडून रणनीती आखली जात आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आपण संपूर्ण कायदेशीर बाबींचा अभ्यास करून मगच निर्णय घेऊ असे सांगितले आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident : अपघाताचा थरार! म्हशीला वाचवताना ५ वाहनांची जोरदार टक्कर, ४ जणांचा जागीच मृत्यू; रस्त्यावर मृतदेहाचा खच

गुप्तधनाचा हंडा काढून देतो म्हणणाऱ्या भोंदू बाबाकडून कोट्यवधींची फसवणूक|VIDEO

Vanjari Community: महाराष्ट्रभर वंजारी समाजाचे ST प्रवर्गातील आरक्षणासाठी चक्काजाम आंदोलन

Nashik Crime: फिरण्याच्या बहाण्यानं मुंबईत आणलं; बाथरुममधील तिचे फोटो काढले,नंतर...

School Firing : शाळेत अंदाधुंद गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १२ जण गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT