Uddhav Thackeray addresses Shiv Sainiks, expressing willingness to step down as Shiv Sena chief if allegations against him are proven true. saam tv
महाराष्ट्र

६ मतदारसंघ, एकच लक्ष्य; बंडखोरांविरोधात ठाकरेंची मोहीम, संपूर्ण दौऱ्याचे वेळापत्रक आले समोर

Uddhav Thackeray : बंडखोर खासदारांविरोधात उद्धव ठाकरे यांनी थेट मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. वाशिम-यवतमाळ, हिंगोली, परभणी, धाराशिव आणि शिर्डीसह सहा मतदारसंघांमध्ये दौरे करून संघटना मजबूत करण्यावर भर दिला जाणार आहे.

Namdeo Kumbhar

- गिरीश कांबळे

Uddhav Thackeray campaign against rebel MPs : पक्षातून फुटलेल्या खासदारांविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आता थेट मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. बंडखोर सहा खासदारांच्या मतदारसंघांमध्ये जाऊन शक्तिप्रदर्शन करण्याची तयारी ठाकरे यांनी सुरू केली असून, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी थेट संवाद साधून संघटना पुन्हा मजबूत करण्यावर भर दिला जाणार आहे.

आज झालेल्या जिल्हाप्रमुख आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत फुटलेल्या सहा मतदारसंघांतील संघटनात्मक परिस्थितीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. बंडानंतरही शिवसैनिक पक्षासोबत ठामपणे उभे राहावेत, यासाठी प्रत्येक मतदारसंघात संघटना अधिक बळकट करण्याच्या सूचना उद्धव ठाकरे यांनी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.

या दौऱ्यात ठाकरे बंडखोर खासदारांच्या मतदारसंघात जाऊन कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न करणार आहेत. वाशिम-यवतमाळ, हिंगोली, परभणी, धाराशिव आणि शिर्डी या मतदारसंघांचा दौरा निश्चित करण्यात आला असून, उद्या ईशान्य मुंबईचाही दौरा होणार आहे.

Uddhav Thackeray campaign against rebel MPs

दौऱ्याचे वेळापत्रक:

२७ जून: वाशिम-यवतमाळ आणि हिंगोली

२८ जून: परभणी आणि धाराशिव

२९ जून: शिर्डी

बंडखोर खासदारांनी पक्षाची साथ सोडल्यानंतर प्रथमच उद्धव ठाकरे थेट त्यांच्या मतदारसंघात उतरून संघटनात्मक ताकद दाखवणार असल्याने या दौऱ्याकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. हा दौरा केवळ संघटनात्मक नसून बंडखोरांना राजकीय आव्हान देणारा मानला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fennel Seeds : कच्ची की भाजलेली बडीशेप? आरोग्यासाठी कोणती अधिक योग्य?

बदली एक्सप्रेस सुसाट! 6 IAS अधिकाऱ्यांच्या अचानक बदल्या; कोणाची कुठे झाली नियुक्ती?

Maharashtra News Live Update: भोंदू अशोक खरात पुन्हा शिर्डी पोलिसांच्या ताब्यात...

उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीला हजेरी लावून घरी गेला; 45 लाखांची लाच घेताना बड्या सरकारी अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडला

Health Tips : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे काय फायदे आहेत? ९९% लोकांना माहितीच नाहीत

SCROLL FOR NEXT