Delimitation Bill and Thackeray Sena's political strategy saam tv
महाराष्ट्र

ठाकरेसेनेची मोठी खेळी; 6 फुटीर खासदारांनाही बजावला व्हीप, शिंदेसेनेत गेलेले खासदार अडचणीत येणार?

Uddhav Thackeray's Political Move Puts: डिलिमिटेशन विधेयकावरून ठाकरेसेनेनं सर्व खासदारांना व्हीप बजावलाय. मात्र, या व्हीपमुळे ठाकरेसेनेनं एका दगडात दोन पक्षी मारल्याचं दिसतंय. व्हीपच्या माध्यमातून ठाकरेसेनेनं टाकलेला नवा डाव काय आहे?... पाहूयात या रिपोर्टमधून...

Rohit Kadam

डिलिमिटेशन विधेयक पुन्हा एकदा संसदेत सादर केलं जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आलाय. अशातच आता ठाकरेसेनेच्या संसदीय दलाची महत्त्वपूर्ण बैठक झालीये. या बैठकीसाठी ठाकरेसेनेनं सर्व खासदारांना व्हिप जारी केला. विशेष म्हणजे, ठाकरेसेनेनं शिंदे सेनेत गेलेल्या 6 फुटीर खासदारांनाही हा व्हिप बजावला. शिंदे सेनेत गेलेले फुटीर खासदार आमच्याच पक्षाचे असल्याचं ठाकरेंनी म्हटलंय. तर लोकसभा अध्यक्षांनी मान्यता दिल्याचं शिंदेसेनेनं म्हटलंय.

तर दुसरीकडे, डिलिमिटेशन विधेयकाच्या माध्यमातून फुटीर खासदारांना व्हिप जारी करून ठाकरेसेनेने नवा राजकीय डाव टाकल्याची चर्चा रंगलीये.

व्हीप बजावलेले फुटीर सहा खासदार कोण आहेत ते पाहूया..

6 फुटीर खासदारांनाही बजावला व्हीप

ओमराजे निंबाळकर

धाराशिव

भाऊसाहेब वाकचौरे

शिर्डी

नागेश पाटील आष्टीकर

हिंगोली

संजय जाधव

परभणी

संजय दिना पाटील

ईशान्य मुंबई

संजय देशमुख

वाशीम

काही महिन्यांपूर्वी ठाकरेसेनेच्या 6 खासदारांनी शिंदेसेनेत प्रवेश केला होता. हे प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. लोकसभा अध्यक्षांनी अद्याप सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणात उत्तर दिलेलं नाही, असं ठाकरेसेनेचं म्हणणं आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरेसेनेनं संसदेच्या अधिवेशनासाठी 6 फुटीर खासदारांनाही व्हीप बजावलाय. त्यामुळे पक्षाच्या व्हीपचं उल्लंघन केल्यास फुटीर खासदारांवर अपात्रतेची कारवाई होणार का ? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actor Viral Photo: प्रसिद्ध अभिनेत्याचे गर्लफ्रेंडसोबतचे खासगी फोटो व्हायरल! संतापून म्हणाला, 'मी त्याला ठार मारेन'

केंद्र सरकारचा मोठा विजय! खासदार-आमदारांच्या संख्या वाढीच्या निर्णयाला कट्टर विरोधकाचा पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Maharashtra News Live Update: इंडिया आघाडीचं शिष्टमंडळ मुंबईत दाखल होणार

जुने कपडे दान करताय? थांबा! कपडे देण्यापूर्वी जाणून घ्या नियम

दिल्लीमध्ये भाजपची डिनर डिप्लोमसी! डझनभर खासदारांना बोलावलं, पडद्यामागे नेमकं काय शिजतंय?

SCROLL FOR NEXT