Raj-Uddhav Thackeray Alliance Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: नव्या युतीसाठी ठाकरेंचं एक पाऊल पुढे; भाजप आणि शिंदेंना दूर ठेवण्याचं आवाहन

Raj-Uddhav Thackeray Alliance: नव्या युतीच्या दिशेने उद्धव ठाकरेंचं एक पाऊल पुढे पडलंय. ठाकरे गटाच्या मुखपत्रातून राज ठाकरेंना साद घातलीय. राज ठाकरे आता काय प्रतिसाद देणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. पाहूया एक खास रिपोर्ट.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मस्कर, साम प्रतिनिधी

ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेनं अवघ्या देशाचं लक्ष वेधून घेतलयं. त्यातच आता ठाकरे गटाच्या मुखपत्रातून संजय राऊतांनी महाराष्ट्राला आणखी काय हवे? असे म्हणत. राज ठाकरेंना आणखी एक अघोषित अट घातलीय.. भाजप, मिंधे या लोकांना दूर ठेवले तर वाद राहतोच कोठे? असा सवाल केलाय, मात्र ही अट नसून त्यामागे उद्धव ठाकरेंची वेदना असल्याचंही राऊतांनी म्हटलयं.

ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चांना वेग आल्यानंतर आता राज ठाकरेंनी मनसैनिकांना युतीबाबत बोलू नका, अशा सूचना दिल्यात त्यामुळे राज ठाकरे स्वत: परदेशातून महाराष्ट्रात परतल्यानंतर युतीच्या विषयावर सविस्तर बोलतील, हे निश्चित. दरम्यान ठाकरे गटाच्या मुखपत्रात युतीबद्दल काय भाष्य केलंय ते पाहूयात.

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राच्या व्यापक हितासाठी एकत्र येण्यास तयार आहेत. याने अनेकांना आनंद झाला तसे अनेक जण पोटदुखीने बेजार झाले. राज ठाकरे यांचे आत्तापर्यंतचे राजकारण नागमोडी पद्धतीचे होते व ते फारसे यशस्वी झाले नाही. शहा-मोदी हे महाराष्ट्र हिताचा विचार करत नाहीत अशी राज यांची भूमिका होती.

त्या भूमिकेला ते चिकटून राहिले नाहीत. भाजपचे हिंदुत्व नकली व तकलादू आहे. या नकली हिंदुत्वाच्या जाळ्यात भाजपने राज यांना अडकवले व गाडे घसरत गेले. भाजप, मिंधे या लोकांना दूर ठेवले तर वाद राहतोच कोठे?

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या साद- प्रतिसादामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालथ झालीय. आता राज ठाकरे काय बोलतात याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागलयं. मात्र भूतकाळातील घटना विसरून राज ठाकरे खरचं युतीसाठी तयार होतील का? मुंबई महापालिका निवडणुकीआधी ही युती झाल्यास युतीमागचं गणित काय असेल? हे पाहणं महत्त्वाचयं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Crime News: मालाडमध्ये बार डान्सरची हत्या; नको त्या अवस्थेत सापडला मृतदेह, नेमकं प्रकरण काय?

Maharashtra Live News Update: पुण्यातील अजित पवारांच्या उपस्थितीत कात्रज दूध डेअरी मध्ये सर्वसाधारण सभेचे आयोजन

Navratri Festival : नवरात्रीची अनोखी परंपरा; कडक उपवासात ९ दिवस बसायचं नाही, झोपायच पण तेही उभं राहून

IND vs SL: श्रीलंकेविरूद्ध टीम इंडियामध्ये ३ बदलांची शक्यता; फायनलपूर्वी 'या' खेळाडूंना मिळणार संधी, पाहा कशी असेल प्लेईंग 11

Devoleena Bhattacharjee: गोपी बहूचे बेबी बंप फोटो व्हायरल; चाहत्यांना देणार पुन्हा गोड बातमी?

SCROLL FOR NEXT